Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मैत्रीची नवी परिभाषा सांगणारा 'यारी दोस्ती'

Webdunia
बुधवार, 22 जून 2016 (12:53 IST)
मराठी सिनेसृष्टी आता जसजशी बहरत चालली तसे यात नवनवीन प्रयोगही होताना दिसत आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नव्याकोऱ्या चेहऱ्यांना घेऊन सिनेमा करण्याचा नवा ट्रेंड आता रुजू होताना दिसत आहे. असाच एक किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित 'यारी दोस्ती' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शांतनु अनंत तांबे लिखित, दिग्दर्शित 'यारी दोस्ती' हा सिनेमा ५ ऑगस्टरोजी प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये कलाकारांचे चेहरे दिसत नसले तरीही त्यांच्या मैत्रीचे बंध यात ठळकपणे जाणवत आहेत.
 
बिपीन शहा मोशन पिक्चर्सच्या भावना बिपीन शहा प्रस्तुत आणि पॅशनवल्ड एंटरटेनमेंट निर्मित 'यारी दोस्ती' सिनेमातून राष्ट्रीय पुरस्कार विजेता हंसराज जगताप याच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. तर 'माझी शाळा' या चित्रपटातून झळकलेला आकाश वाघमोडे मुख्य भूमिकेत दिसेल. आशिष गाडे, सुमित भोकसे, श्रेयस राजे हे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज आहे. यांच्यासोबतच 'उर्फी' फेम मिताली मयेकर एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळणार आहे. मैत्रीची नवी परिभाषा सांगणाऱ्या या सिनेमात संदीप गायकवाड, निशा परुळेकर, अशोक पावडे, नम्रता जाधव आणि जनार्दन सिंग यांच्याही भूमिका पहायला मिळणार आहेत

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

Chitrakoot Mountains आश्चर्यकारक चित्रकूट पर्वत

तारक मेहता फेम अभिनेता गुरुचरण सिंग सोढी विमानतळावरून बेपत्ता, तक्रार दाखल

शेगाव गजानन महाराज मंदिर परिसरातील दर्शनीय स्थळे

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बेबी बंबचे रेखाने घेतले चुंबन, सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

Salman Khan Firing Case: सलमानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणातील आरोपींना 29 एप्रिलपर्यंत कोठडी

पुढील लेख
Show comments