Dharma Sangrah

समरजित घाटगे यांचा भाजपला राम राम, लवकरच करणार शरद पवारांच्या पक्षात प्रवेश

Webdunia
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2024 (11:16 IST)
Samarjeet Ghatge Facebook
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका वर्षाच्या अखेरीस होणार असून सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्व महायुतीला मोठा धक्का बसला आहे. विधानसभा निवडणूक लढवणाच्या इच्छुक असलेले समरजित घाटगे यांनी भाजपला राम राम करत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 
घाटगे 3 सप्टेंबर रोजी कागलमधील गैबी चौक येथे शरद पवार, खासदार शाहू महाराज आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार आहे. 

समरजित घाटगे यांच्या ट्विटर अकाऊंट वरून भाजपचं कमळ चिन्ह गायब झालं आहे. महायुतीच्या कोल्हापुरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी समारंभाला समरजित घाटगे यांची अनुपस्थितीमुळे राजकीय चर्चेला उधाण आले. 

समरजित घाटगे हे देवेंद्र फडणवीसांचे जवळचे मानले जातात. मात्र मुश्रीफ विद्यमान आमदार असल्यामुळे त्यांना विधानसभा निवडणुकीचं तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे घाटगे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता बळकट झाली. गेल्या काही दिवसांपासून समरजित घाटगे हे भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. घाटगे आता 3 सप्टेंबर रोजी शरदचंद्र पक्षात प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. 
 
Edited by - Priya Dixit   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

भारताची स्टार कुस्तीपटू 31 वर्षीय विनेश फोगटने निवृत्तीनंतर पुनरागमनाची घोषणा केली

गोव्यानंतर ओडिशातील एका नाईटक्लब मध्ये भीषण आग, जनहानी नाही

कोकण रेल्वेने डिसेंबरच्या सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक विशेष गाड्यांची घोषणा केली

LIVE: डिसेंबरच्या सुट्ट्यांसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार

आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये बस दरीत कोसळली; अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments