Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित अफवा फेटाळल्या

Webdunia
सोमवार, 2 डिसेंबर 2024 (15:49 IST)
Shrikant Shinde News: महाराष्ट्रात अद्याप मुख्यमंत्रीच्या नावावर सस्पेन्स आहे. दरम्यान कल्याणमधील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याचा अफवा फेटाळून लावल्या.ते म्हणाले मी राज्यात कोणत्याही मंत्रिपदासाठी निवडणूक लढवत नाही. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निवेदन दिले आहे. 
ALSO READ: मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत...प्रियांका चतुर्वेदींचे धक्कादायक वक्तव्य
त्यांनी Xएक्स वर लिहिले की "निवडणुकीच्या निकालांनंतर सरकार स्थापनेला थोडा विलंब झाला असून अनेक अफवा निघत आहे. की मी नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होणार. मी हे सर्वांना सांगू इच्छितो की हे पूर्णपणे निराधार आणि खोटे आहे. यात काहीही सत्य आणि तथ्य नाही. मला सत्तेत कोणत्याही पदाची इच्छा नाही असे त्यांनी म्हटले आहे. 
<

महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्हे…

— Dr Shrikant Lata Eknath Shinde (@DrSEShinde) December 2, 2024 >
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवस प्रकृती अस्वास्थ्यामुळे गावी गेले आणि तेथे विश्रांतीसाठी गेले, त्यामुळे अफवा पसरत आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मला केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळाली, पण तरीही पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी मंत्रीपद नाकारले. मला सत्तेत पदाची इच्छा नाही. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी राज्यातील कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. मी माझा लोकसभा मतदारसंघ आणि माझा पक्ष शिवसेनेसाठीच काम करणार आहे.मी माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा समजू शकतो, परंतु त्याच वेळी त्यांनी वस्तुस्थितीकडे डोळेझाक करू नये. मला आशा आहे की माझ्याबद्दलच्या अफवा आता थांबतील.”
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

शिवसेना शिंदे गटाचे नेते शिक्रापूरचे माजी उपसरपंच यांचा धारदार हत्याराने निघृण खून

धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

मुख्यमंत्री शपथ घेत नाहीत तोपर्यंत...प्रियांका चतुर्वेदींचे धक्कादायक वक्तव्य

माजी IAS अधिकाऱ्याच्या मुलीने 29 व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या

मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने 7 जण अडकले

पुढील लेख
Show comments