Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपचा विरोध असतानाही अजित पवारांनी नवाब मलिक यांना का दिले तिकीट? मजबुरी की आणखी काही…

Webdunia
बुधवार, 30 ऑक्टोबर 2024 (11:09 IST)
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. तसेच उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाला न जुमानता नवाब मलिक यांना मुंबईतील शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली. याशिवाय त्यांनी अपक्ष म्हणूनही अर्ज दाखल केला.
 
मिळालेल्या माहितीनुसार भाजप पहिल्या दिवसापासून नवाब मलिक यांच्या उमेदवारीला विरोध करत आहे. नवाब मलिक यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध आणि मनी लाँड्रिंग प्रकरणाचा हवाला देत भाजप विरोध करत होता. उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम होता. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळालेला नव्हता. अजित पवार यांनी याबाबत मौन बाळगले होते. अखेरच्या क्षणी अजित पवारांनी त्यांना मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट दिले.  
 
अजित पवारांसाठी नवाब मलिक ही मजबुरी आणि गरज दोन्ही आहे. मानखुर्द येथे मुस्लिमबहुल मतदारसंघात नवाब मलिक यांचा सामना ज्येष्ठ सपा नेते अबू आझमी यांच्याशी आहे. 
 
नवाब मलिक अणुशक्ती नगरमधून 5 वेळा आमदार असून त्यांना या जागेवरून निवडणूक लढवायची होती, भाजपच्या विरोधामुळे राष्ट्रवादीने त्यांची मुलगी सना मलिक यांना या जागेवरून तिकीट दिले. मानखुर्द मतदारसंघातून राष्ट्रवादीकडे ठोस पर्याय नव्हता. त्यामुळे अजित पवार यांनी भाजपच्या विरोधाकडे दुर्लक्ष करून नवाब मलिक यांना तिकीट दिले.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

LIVE: शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्रात मतदान संपताच केला मुख्यमंत्रीपदावर दावा

पुढील लेख
Show comments