Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, राज्यातील अर्थसंकल्पामधल्या महत्त्वाच्या घोषणा आणि तरतुदी अशा

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2023 (21:51 IST)
अमृत काळातील पहिला अर्थसंकल्प.
पंचामृत ध्येयावर आधारित
१. शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी
२. महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास
३. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास
४. रोजगारनिर्मिती
५. पर्यावरणपूरक विकास
 
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना मिळणार आहे. यासाठीच सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 12 हजार रुपये मिळतील.  प्रति शेतकरी, प्रति वर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार आहे. केंद्र सरकारचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये शेतकऱ्यांना प्रतिवर्ष मिळणार आहेत. राज्यातील 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. तशी घोषणा फडणवीसांनी विधिमंडळात केली.
 
– छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाचे यंदाचे हे 350 वे वर्ष. यानिमित्त या महोत्सवासाठी 350 कोटी रुपयांची तरतूद
– आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान उभारणार. त्यासाठी 50 कोटी रुपये
– मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने उभारणार : 250 कोटी रुपये
– शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय उभारणार. तसेच, शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन यासाठी 300 कोटी रुपये
 
– महिलांना राज्य परिवहन महामंडळांना बस प्रवासाच्या तिकीट दरात सरसकट 50 टक्क्यांची सूट;
– महात्मा फुले जनआरोग्य योजनेत उपचारखर्च दीड लाखावरुन 5 लाख करण्यात येणार.
– राज्यभर ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ अंतर्गत 700 दवाखाने सुरु करणार.
 
– गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
 
– धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
– महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
– 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Sarvapitri Amavasya 2024: सर्वपित्री अमावस्या बद्दल 10 न ऐकलेल्या गोष्टी जाणून घ्या

शारदीय नवरात्रीचे व्रत करण्यापूर्वी नियम जाणून घ्या

गजलक्ष्मी व्रत कथा वाचा, घरात लक्ष्मी नांदेल, सुख-संपत्ती, पुत्र-पोत्रादी आणि कुटुंब सुखी राहील

पितृ दोष म्हणजे काय ? निवारण उपाय जाणून घ्या

Shardiya Navratri 2024 : 3 की 4 ऑक्टोबर, शारदीय नवरात्र कधी सुरू होत आहे, घटस्थापनेची शुभ वेळ जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत मुसळधार पावसात नाल्यात पडून महिलेचा मृत्यू, BMC विरोधात FIR दाखल

Badlapur Encounter बदलापूर एन्काउंटरवर काय म्हणाले रामदास आठवले ?

तिचे 59 तुकडे करून पळाला, पकडल्या जाण्याच्या भीतीने आत्महत्या केली

नवीन जागतिक व्यवस्थेला आकार देत आहे भारत - ईशा अंबानी

मानहानी प्रकरणात संजय राऊत दोषी, 15 दिवसांची शिक्षा

पुढील लेख
Show comments