ठाणे जिल्हयातील कल्याणच्या दक्षिणेस सुमारे 15 कि.मी. अंतरावर मलंगगड किल्ला आहे. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे आणि हाजीमलंग या मुसलमान साधूची कबर आहे. या कबरीच्या पूजेचा मान आजही हिंदूकडेच आहे. माघ पौर्णिमेस येथे मोठी यात्रा भरते.
रायगड जिल्हयातील अन्य किल्ल्याप्रमाणेच माथ्यावर अवघड सुळका, व खाली थोडी माची आहे. ठाणे जिल्हयाच्या व रायगड जिल्हयाच्या सरहद्दीवर या किल्यावर
बाबामलंग यांची समाधी आहे. किल्ल्यावरील पुजास्थानाच्या वर बराच उंच डोंगर आहे. तेथे तटबंदी, प्रवेशद्वार पाण्याची तळी, बुरुज आढळतात. अगदी उंचावरुन आजूबाजूला पाहिल्यास कुर्ला-मुंबईचा परिसर, पनवेलपर्यंतचा प्रवेश, तसेच माथेरानचा प्रदेश दिसतो. कल्याण स्थानकावरुन गडाच्या पायथ्याशी जाण्यासाठी बसचा उपयोग होतो.
कसे पोहचाल ?
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्टेशन – कल्याण ( सेंट्रल रेल्वे )
बसने
मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकाहून अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. गडाच्या निम्म्या उंचीवर तेथील सुप्रसिद्ध हाजीमलंग दर्गा आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्यापासून २ तास लागतात.