Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

किल्ले चौल्हेर

Webdunia
शनिवार, 7 जुलै 2018 (00:59 IST)
चौल्हेर हा किल्ला देखणा आहे. भक्कम आणि वास्तुवैभवाने नटलेला आहे. नाशिकहून सटाणा, सटाण्याहून तिळवण येथे गेल्यानंतर जवळच वाडी-चौल्हेर हे पायथ्याचे गाव लागते. येथे येईपर्यंत सायंकाळ होते. पौर्णिमेचं दुधाळ चांदणे गडावर पसरलेले असते. अशावेळी गड चढण्यात एक आगळीच मजा असते. बरोबर मार्गदर्शक घेणे फायद्याचे ठरते.
 
सूर्यास्त झाल्यानंतर चांदणं असलं म्हणजे पायाखालची वाट स्पष्ट दिसते. गडकोटांचं रात्रीचं विश्व काही वेगळंच असतं. तासाभराची खडी चढाई झाल्यानंतर कातळकोरीव पार लागतात. या पायर्‍या चढून गेल्यानंतर गडकिल्ल्यावरची शोभा पाहून मन प्रसन्न होते. एका मागोमाग सलग तीन दरवाजे दृष्टीला पडतात.
 
प्रत्येक किल्ला त्याचं वेगळं रूप आपल्यासमोर मांडत असतो. कधी इतिहासातून, कधी भूगोलातून तर कधी स्थापत्यातून त्याचं रूप दिसतं. या स्थापत्यातून सारे पदर असतात. पाण्याची टाकी, तटबंदी, बुरूज, गुहा, पार आणि चौल्हेरची दरवाजांची रांग हे तीन दरवाजे म्हणजे चौल्हेरच्या गडसफरीच.
 
हे दरवाजे पार केले की डाव्या बाजूला छोटी माची लागते आणि उजव्या बाजूला बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. या दरम्यान पायर्‍या आणि पाण्याची टाकी दिसते. हे सारे पार केल्यावर बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. चांदणे असल्यामुळे वाट स्पष्ट दिसते. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावर चौरंगनाथ आणि हनुानाच्या मूर्ती आहेत.
तिळवाचा किल्ला अथवा चौरगड किंवा चौल्हेरचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्‍यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.
 
नाशिकमध्ये येऊन गडदुर्ग पाहणार्‍या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. ही भटकंती ठरावीक दुर्गांसाठीच न करता चौल्हेरचा किल्ला पर्यटकांनी अवश्य पाहावा. या गडाचं देखणेपण पर्यटकांची वाट सफल आणि सुफल करेल यात शंका नाही.
 
म. अ. खाडिलकर 

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

पुष्करचा यंदाचा वाढदिवस ठरणार 'खास',आज्जीबाई जोरात’ नाटकाद्वारे पुष्कर गाठणार वेगळी ‘उंची’

रणवीर सिंगच्या डिपफेक व्हिडिओप्रकरणी अपडेट, आरोपींना नोटीस

'छावा' च्या सेटवरुन लीक झाला विकी कौशलचा लुक, छत्रपती संभाजी महाराजांच्या अवतारात दिसले

सलमान खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मुंबई पोलिसांनी तापी नदीतून दोन पिस्तूल आणि गोळ्या जप्त केल्या

Tourist attraction पर्यटकांचे आकर्षण: बोर व्याघ्र प्रकल्प

पुढील लेख
Show comments