Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईजवळ कॅम्पिंग ठिकाणे शोधत आहात, ही सर्वोत्तम ठिकाणे एक्सप्लोर करा

camping spots near Mumbai
Webdunia
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (13:57 IST)
ज्या लोकांना कॅम्पिंगची आवड आहे त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाणे आवडते. छोट्या तंबूत, मोकळ्या आकाशाखाली राहणे जरा अवघड आहे पण अनुभव खूप मजेशीर आहे. बऱ्याचदा तुम्ही मुंबई जवळील हिल स्टेशन बद्दल ऐकले असेल पण तुम्ही इथे कॅम्पिंग केल्याबद्दल ऐकले आहे का? वीकेंडला मुंबईतील या सर्वोत्तम ठिकाणी कॅम्पिंग करण्याची एक वेगळीच मजा आहे. या ठिकाणी कॅम्पिंगसाठी तुम्ही तुमच्या पार्टनर किंवा तुमच्या मित्रांसोबत जाऊ शकता. शहरापासून काही तासांच्या अंतरावर अनेक कॅम्पिंग पर्याय आहेत. जिथे तुम्ही शहरी जीवनापासून दूर वेळ घालवू शकता. मुंबईजवळच्या कॅम्पिंग ठिकाणांबद्दल जाणून घ्या.
 
वासिंद- मुंबईभोवती रात्रीच्या शिबिरासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. हे मुंबईपासून अवघ्या 63 किलोमीटर अंतरावर आहे. येथील वातावरण अतिशय शांत आणि निवांत आहे. येथे तुम्ही कॅम्पिंग अ‍ॅक्टिव्हिटी, राफ्टिंगसारख्या वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद घेऊ शकता.
 
कर्नाळा- मुंबईपासून फक्त 48 किलोमीटर अंतरावर हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. तुम्ही इथे असाल तर करनाला पक्षी अभयारण्य बघायला नक्की जा. येथे तुम्हाला अनेक प्रकारचे पक्षी आढळतील. याशिवाय तलावात बोट राईडचाही आनंद लुटता येतो. येथे भेट देण्यासाठी हिवाळा हा सर्वोत्तम काळ आहे.
 
शिरगाव बीच- बीच कॅम्पिंगसाठी एक लहान ठिकाण म्हणजे पालघरमधील शिरगाव बीच. येथे तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये काही संस्मरणीय क्षण घालवू शकता. मुलांसाठी उंट आणि ATV बाईक राइड आहेत.
 
भातसा धरण-  मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण कॅम्पिंगसाठी सर्वोत्तम मानले जाते. कारण इथे पोहण्यापासून बोट राईड पर्यंत सर्व काही तुम्ही करू शकता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्टेजवर ढसाढसा रडली नेहा कक्कर, चाहत्यांनी दिली प्रतिक्रिया

अक्षय कुमारच्या केसरी 2 चा टीझर प्रदर्शित, जालियनवाला बाग हत्याकांडाची कहाणी दाखवली जाणार

इमरान हाश्मीची पत्नी परवीन त्याला तिच्यासाठी अनलकी मानते, कारण जाणून घ्या

कंगना राणौतला तिचे वडील डॉक्टर बनवू इच्छित होते, ती बनली बॉलिवूडची क्वीन

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

सर्व पहा

नवीन

रेसिपी आणि मजेशीर कंमेंट्स

‘एप्रिल मे ९९’ मध्ये झळकणार ‘हे’ चेहरे

श्रेयस तळपदे विरोधात चिट फंड घोटाळा प्रकरणात FIR दाखल

भगवान रामाशी संबंधित घड्याळ घालून सलमान खानने चाहत्यांची मने जिंकली

Chaitra Navratri 2025 : चंद्रिका देवी मंदिर लखनऊ

पुढील लेख
Show comments