Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाबळेश्वर एक थंड हवेचे नयनरम्य ठिकाण...

महाबळेश्वर एक थंड हवेचे नयनरम्य ठिकाण...
, सोमवार, 17 फेब्रुवारी 2020 (12:40 IST)
महाबळेश्वर साताऱ्या जिल्ह्यातील थंड हवेचे आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला उत्कृष्ट गिरिस्थान म्हणून लाभले आहे. हे ठिकाण निसर्गरम्य आणि नयनरम्य असून वर्ष भर पर्यटकांनी भरलेले असते. ह्याला महाराष्ट्राचा नंदनवन म्हणून पण ओळखतात. 
 
साताऱ्या जिल्ह्यातील नगरपालिका असणारे तालुक्याचे हे शहर पश्चिम घाटातील उंच डोंगरावर वसले आहे. मळकोम पेठ, जुने क्षेत्र महाबळेश्वर आणि शिंडोलचा भाग, अशा तीन खेडेगावांना मिळून हे शहर निर्माण झालेले आहे. इथे मराठी आणि हिंदी भाषेचा प्रयोग केला जातो. हे शहर पुण्याहून 120 कि.मी. आणि मुंबई पासून 285 कि.मी.अंतरावर आहे. 
 
हे विशाल पठार असून आजू-बाजूस खोल दऱ्या आहेत. इथले जे विल्सन /सनराईज पॉइंट सर्वात उंच ठिकाण आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहणारी कृष्णा नदीचा उगम इथेच झाला आहे. जुन्या काळाचे महादेव मंदिराच्या जवळ असलेले गोमुखातून या नदीचा उगम झाला आहे. या मागची दंतकथा अशी आहे की सावित्रीने विष्णूला शाप दिला आणि विष्णूची ही कृष्णा झाली. त्याशिवाय वेण्णा आणि कोयना या उपनद्या शिव आणि ब्रह्माचे रूप आहे. या बरोबरच आणखी 4 नद्या त्याच "गो" मुखातून उगम झाल्या आहेत. 
 
स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठीचे लागणारे योग्य हवामान महाबळेश्वरचे आहे त्यामुळेच इथे स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. जवळपास 85% स्ट्रॉबेरीचे उत्पादन येथे केले जाते. महाबळेश्वरचे देऊळ 13 व्या शतकात यादव राजा सिंघनदेव याने बांधले. अफझल खानाच्या तंबूतून आणलेले सोन्याचे कळस शिवाजी राजेंनी या मंदिरास अर्पण केले होते. सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी घनदाट वन संपदा आहे. याचा जवळ असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड शिवरायांच्या कर्तृत्वाचे इतिहास सांगतात.
 
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हा परिसर जलमय असतो. खंडाळा, लोणावळा, माथेरान प्रमाणेच इथले निसर्ग सौंदर्य आणि इथले विल्सन पॉइंट, आर्थर सीट पॉइंट, लॉडनिग पॉइंट प्रेक्षणीय स्थळ असून इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. इथल्या मंदिरातून कृष्ण, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गोवित्री या पाच नद्यांचे उद्गम होते. 
 
इथे पंचगंगेचे देऊळ आहे. सावित्री नदी पश्चिमेला वाहते बाकीच्या नद्या पूर्वेला वाहतात. वेण्णा तलाव इथले मोठे आकर्षण स्थळ आहे. वाघाचे पाणी नावाचा मोठा जलाशय येथे आहे. येथे वाघ पाणी पिण्यासाठी येतात अशी समज आहे.
 
येथील स्ट्रॉबेरी, रासबेरी, जांभळाचे मध, लाल मुळे, गाजर प्रसिद्ध आहे. मध तर चविष्ट आणि प्रसिद्ध आहे. गुलकंद पण इथे मोठ्या प्रमाणात मिळतो आणि प्रसिद्ध आहे. इथे जवळपास प्रेक्षणीय स्थळे आहे 5 मंदिर जे उत्कृष्ट वास्तुकलेचे दर्शन घडवितात. महाबळेश्वर 5 नद्यांचे उगम स्थान म्हणून ओळखले जाते. इथल्या बाजारपेठेत लोकरीचे कपडे, स्वेटर, चामड्याचे बेल्ट, पर्सेसचे विविध प्रकार मिळतात. तसेच इथले चणे-फुटाणे पण प्रसिद्ध आहे.
 
प्रेक्षणीय स्थळे :
 
1 पंचगंगा मंदिर
इथे कृष्णा, कोयना, गायत्री, सावित्री, वेण्णा, सरस्वती, भागीरथी या 7 नद्यांचे उगम स्थान आहे. सरस्वती आणि भागीरथीच्या ओहोळ सोडून बाकीच्या नद्यांचे ओहोळ 12 ही महिने सतत वाहत असतो. पण सरस्वतीचा ओहोळ दर 60 वर्षांनी दर्शन देतो. तसेच भागीरथीच्या ओहोळ दर 12 वर्षांनी दर्शन देत असतो. इथून बाहेर पडल्यावर कृष्णा नदी स्वतंत्रपणे वाहते. इथे या नदीचे स्वतंत्र मंदिर पण आहे.
 
2  कृष्णाबाई मंदिर 
पंचगंगा मंदिराच्या मागील भागास कृष्णाबाईचे मंदिर आहे. येथे कृष्णा नदीची पूजा केली जाते. या मंदिराची स्थापना सन 1888 मध्ये कोंकणचे राजा "रत्नागिरी ओण" यांनी केली होती इथून कृष्णा दरी बघता येते. या मंदिरात कृष्णाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. इथले दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर आता ओसाड झालेले असून मंदिर जवळ दलदल झालेली असून ती नाशवंत स्थितीत आहे त्यामुळे पर्यटक इथे कमी जातात. 
 
3 मंकी पॉइंट 
इथे नैसर्गिकरीत्या तीन दगड आहे ते मंकी सारखे समोरासमोर बसलेले आहे आणि ते गांधीजींच्या शब्दांची आठवण करून देतात असे वाटत आहे. असे चित्र नजरेस येते. आर्थर सीट पॉइंट जाण्याच्या मार्गावर हे पॉइंट आहे.
 
4 आर्थर सीट पॉइंट 
सर आर्थरच्या नावामुळे या जागेचे नाव आहे. समुद्र तळापासून 1340 मीटर उंचीवर असलेले हे प्रेक्षणीय पॉइंट आहे. इथून खाली खूप खोल दऱ्या आहे. 
 
5 वेण्णा लेक (वेण्णा तलाव) 
महाबळेश्वरातील प्रमुख आकर्षक, विश्रांती, सहलीचे हे ठिकाण आहे. सर्व बाजूने हिरव्यागार झाडांनी वेढलेले हे ठिकाण आहे.
 
6 केइंटटस् पॉइंट 
महाबळेश्वरच्या पूर्वी बाजूस हा पॉइंट आहे. इथून ओम धरणं आणि बळकावडी देखावे बघता येतात. पॉइंटची उंची साधारणपणे 1280 मीटर आहे.
 
7 नीडल होल पॉइंट/एलिफेन्ट पॉइंट 
नैसर्गिकरीत्या खडकाला सुईसारखे भोक असल्याने ह्या पॉइंटचे हे नाव पडले आणि हत्तीच्या तोंडा सारखा हा पॉइंट दिसतो म्हणून एलिफेन्ट पॉइंट नाव दिले आहे.
 
8 विल्सन पॉइंट 
सर लेस्ली विल्सन सन 1923 ते 1926 मुंबईचे राज्यपाल असल्याने त्यांचा नावाने या पॉइंटला ओळखले जाते. 1439 मी. उंचीवरचा हा सर्वात उंचीचा हा पॉइंट आहे. इथून सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्हीही बघू शकतो. महाबळेश्वरची संपूर्ण दिवसाची आकर्षकता इथून बघू शकता. हे स्थळ महाबळेश्वर शहरापासून 1.5 कि.मी. अंतरावर आहे. 
 
9  प्रतापगड 
शिवाजी महाराजांनी बांधलेला हा किल्ला महाबळेश्वरजवळ आहे. या किल्ल्यात राजेंनी विजापुराचे सरदार अफझल खानाला हरवून ठार मारले. दरवर्षी येथे शिवप्रताप दिन साजरा केला जातो.
 
10  लिंगमाला धबधबा 
महाबळेश्वरजवळ हा धबधबा असून 600 फूट उंची वरून ह्याचे पाणी वेण्णा तलावात पडते. खडक्यांचे योजणेपूर्वक विभाजन करून या धबधब्याचे निर्माण केले गेले आहे. 
 
कसे जाल- 
बस मार्ग : साताऱ्या जिल्ह्यातील वाई या तालुक्याच्या गावापासून महाबळेश्वर 180 कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग 4 ला महाबळेश्वर जोडले आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई येथून महाबळेश्वरला जाण्यासाठी MSRTC  च्या बस , खासगी बस, खासगी वाहने उपलब्ध आहे.
 
रेल्वे मार्ग : 100 कि.मी.च्या अंतरावर सातारा हे जवळचे स्टेशन आहे. पुणे 220 कि.मी., मुंबई 370 कि.मी. असून कोंकण रेल्वेचे खेडं स्टेशन 90 कि.मी. अंतरावर आहे.
 
हवाई मार्ग : पुणे, आंतरराष्ट्रीय विमानतळ 180 कि.मी. अंतरावर आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 200 कि.मी. अंतरावर आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Bigg Boss: जाणून घ्या सर्व 13 पर्वांच्या विजेत्यांची नावे