Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ramsej रामसेज का नाव पडलं ?

Webdunia
शुक्रवार, 24 मार्च 2023 (23:43 IST)
मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करणसाठी औरंगजेब प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये उतरला. नाशिक प्रांतात त्याचं वर्चस्व होतं. पण नाशिकजवळ असणारा रामसेज मात्र तस वाकुल दाखवत होता. रामसेज प्रचंड आणि उंच असा नाही, पण प्रचंड अशा मोगली सैन्याला या किल्ल्याने जवळपास सहा वर्षे झुंजवलं. रामसेजला वेढा घालून बसलेला सरदार शहाबुद्दीन खान याला यशच काय, यशाचा सदराही धरता आला नव्हता. हे यश मिळालं नाही, तर बादशहाकडं आपली अप्रतिष्ठा ठरलेलीच.‘रामसेज’वर हल्ला चढवाचा आणि आपल्या सैनिकांना दफन करायचं एवढंच काम त्यांच्याकडं उरलं होतं. अखेर त्याचा मोतदार त्याला म्हणाला, भुते वश करणकामी मी पटाईत आहे. शंभर तोळे वजनाचा एक सोनचा साप तयार करा. तो माझ्या हाती द्या आणि हल्ल्याच्या वेळी मला आघाडीवर ठेवा. मी भुतांच्या साहाय्याने किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत कोणतीही अडचण न येता जाऊ शकतो. खानानं त्याच्या म्हणणप्रमाणं केलं. तो मोतदार हल्ल्याच्या वेळी पुढे उभा राहिला. तेवढय़ात किल्ल्यावरून गोफणीचा गोळा येऊन त्याच्या छातीवर इतक्या जोरात लागला की मोतदाराच्या हातून सोन्याचा नाग उडाला आणि मोतदार धराशायी झाला. हे पाहून मोगल सैन्याचा धीर खचला. खूप प्रयत्न केले. पण रामसेजवरील मराठे त्याच्यासाठी अजय ठरले. औरंगजेबानं खानास वेढा उठवून परत येण्यास सांगितलं. अपमानित झालेला खान चिडला. तंबू सावरला. राम सेजवर आग ओकण्यासाठी म्हणून लावलेल्या तोफा शांत करून त्यांची तोंडंही वळवण्यात आली. किल्ल्यावर आक्रमण करण्यासाठी म्हणून खानानं लाकडाचा दमदमा उभारला होता. रागाच्या भरात खानानं तो पेटवून देण्याचा हुकूम केला. त्यात पेंढा आणि दारू भरून पेटवण्यात आला. प्रचंड जाळ झाला. रामसेजवरील मराठे तटावर उभं राहून पाहात होते. नगारे आणि चौघडे वाजवत ते हलकल्लोळ माजवत होते.
 
कसा होता रामसेजी? का नाव पडलं रामसेज असं? असं म्हणतात, श्रीराम वनवासात असताना काही दिवस त्यांच्या मुक्काम या डोंगरावर होता. त्यामुळंच हा डोंगर रामाची शय्या म्हणजे रामसेज म्हणून ओळखला जातो. डोंगराच्या पायथ्याशी आशेवाडी नावाचं गाव. वाडीतून  कांही वेळातच राममंदिराजवळ येता येतं. इथं पाण्याची टाकी आहे. तुटलेल तटबंदीतून गडावर प्रवेश होतो. उजव बाजूस गडाचे ङ्कुख् प्रवेशद्वार आहे. तच सङ्कोर तटामधील खोलगट भागात खालच्या बाजूस चोरदरवाजा. गडावर उद्ध्वस्त चौथरे, गुहा आहेत.
 
शहाबुद्दीनच्या जागी औरंगजबाने कासिम खान किरमाणी या शूर सरदारास पाठवलं. परंतु कासिम खानानं परिश्रम करूनही गड अभेद्य राहिला. भीमसेन सक्सेना म्हणतो, अनेक गोष्टी केल्या पण रामसेजचा किल्लेदार सर्व मराठ्यांच्यात अत्यंत अनुभवी, कसलेला होता. त्याचे प्रयत्न आणि सावधगिरी यामुळे मोगली फौजेचे ही चालेना. गडात लोखंडी तोफा बनवल्या जात. त्यात ते कातडे भरवून तोफ्या उडवित. अशी एक एक तोफ दहा तोफ्यांचे काम करी.’सतत होणारा पराभव आणि सैनिकांचं होणारं नुकसान यामुळं हताश झालेल्या औरंगजेबानं वेढय़ाचं काम तहकूब केलं. रामसेजवरील लोकांचा पराक्रम पाहून छ. संभाजीराजांनी किल्लेदाराकडं मानाचा पोषाख, रत्नजडित कडे, रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. त्याची आपल्या प्रमुख गडावर नेमणूक केली. संभाजीराजांनी गडावर अन्य किल्लेदाराची नेमणूक केली खरी. पण याच किल्लेदारानं सहा वर्षानी स्वराज्याशी बेईमानी करून हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला. परंतु रामसेजच्या काळजात असलेले आनंदाचे क्षण न झिरपता चिरंतन राहिले आहेत.
 
डॉ. नभा कापडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

चंदिगडमध्ये गायक आणि रॅपर बादशाहच्या नाईट क्लबवर बॉम्ब हल्ला

स्वातंत्र्यसंग्रामाचा साक्षीदार झाशीचा किल्ला

Rakhi Sawant: गरिबीत गेले बालपण,त्यानंतर राखी बनली बॉलिवूडची ड्रामा क्वीन

कांतारा चॅप्टर 1 च्या स्टार कास्टच्या बसचा अपघात,अनेक जण गंभीर जखमी

पुढील लेख
Show comments