Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Maharashatra Day 2023 समुद्रात ढोल ताशाचं वादन

Webdunia
सोमवार, 1 मे 2023 (12:59 IST)
महाराष्ट्रासाठी 1 मे हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. या दिवसाला जगभरात आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. अठराव्या शतकात झालेल्या कामगार चळवळीच्या गौरवासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जगभरात हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. 
 
सातासमुद्रपार असलेल्या मराठी माणूसदेखील वेगवेगळ्या पद्धतीने महाराष्ट्र दिन साजरा करतो. आखाती देशातील पहिले आणि एकमेव पारंपारिक ढोल ताशा पथक त्रिविक्रम ढोल ताशा यांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने एक आगळा वेगळा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. 
 
महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी त्यांनी चक्क एक लक्झरी योटवर, पर्शियन गल्फ या समुद्रात जगातील एकमेव 7 स्टार हॉटेल 'बुर्ज अल अरब' याच्यासमोर पाण्यात ढोल ताशाचं वादन केलं. पथकाचे संस्थापक सागर पाटील यांच्या डोक्यातून ही आगळी वेगळी संकल्पना समोर आली.
 
या उपक्रमात पथकातील 20 वादकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे यात महिलांचाही समावेश होता. ही योट दुबई मरीनामधून वादकांना घेऊन निघाली आणि वाटेत  Dubai Eye Giant Wheel समोरून वादन करीत बुर्ज अल अरब या हॉटेलच्या समोर थांबली. या ठिकाणी ढोल ताशाचे वादन करून या पथकाने परतीचा प्रवास केला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

कोरोना महामारीदरम्यान मृत्यू झालेल्या 5 कोरोना योद्ध्यांना दिल्ली सरकार प्रत्येकी 1 कोटी रुपये देणार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले

दिल्लीहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये प्रवाशांच्या जेवणात आढळले झुरळ

मुंबई सिनेट निवडणुकामध्ये शिवसेनाने यश मिळवला, ही तर विजयाची सुरुवात -आदित्य ठाकरे

अरविंद केजरीवाल लवकरच मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार

पुढील लेख
Show comments