Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कलावतींची माघार दुर्देवी- तिवारी

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2009 (10:46 IST)
कलावती बांदुरकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघातून ऐन वेळी माघार घेतल्याने आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांसाठी हाती घेतलेल्या लढ्याची पिछेहाट झाली आहे, अशी खंत कलावतीला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणार्‍या विदर्भ जनआंदोलन समितीने व्यक्त केली आहे. कलावती यांनी माघार घेतल्यामुळे आपल्याला मोठा धक्का बसल्याचे समितीने म्हटले आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सहा हजार विधवांच्या कल्याणासाठी लढण्याचा आणि सामाजिक सेवेत स्वतःला वाहून घेण्याचा निर्धार व्यक्त करून राजकीय रिंगणात उतरलेल्या कलावती यांनी अशा रीतीने माघार घ्यायला नको होती. त्यांच्या माघारीच्या निर्णयाने आपली निराशा झाली आहे, असे समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी म्हणाले. निवडणुकीत विजयी होणे किंवा पराभूत होणे हा आमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नव्हताच. कलावती यांची निवडणूक रिंगणातील उपस्थिती आवश्यक होती. कारण, आजच्या लोकशाही व्यवस्थेत कुठलाही लढा राजकीय क्षेत्रात सक्रिय राहूनच समर्थपणे देता येतो. आम्हाला कलावती यांच्याकडून हीच अपेक्षा होती, असे तिवारी म्हणाले.

कलावती यांना मदत करणार्‍या सुलभ इंटरनॅशनलने तिच्यावर दबाव का आणावा, राजकारण हे कलावतीसारख्या सामान्य महिलेचे क्षेत्र नाही, असे या संस्थेला का वाटावे, याचे उत्तर आपल्याला आप मिळालेले नाही,असे सांगत कलावती यांच्या जागी रिंगणात उतरलेल्या बेबीताई बैस यांच्याकडून आम्हाला खूपच अपेक्षा आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या विधवांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा आता त्या लढतील, अशी आशा तिवारी यांनी यावेळी व्यक्त केली.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

LIVE: शिंदेंनी शिवसेना यूबीटी नेत्यांचे त्यांच्या पक्षात स्वागत केले

महाराष्ट्राला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला नवी भेट दिली, 7 नवीन उड्डाणपुलांचे केले उद्घाटन

उद्धव ठाकरे गटातील अनेक नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांची उच्च न्यायालयात धाव

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काँग्रेस नेता प्रफुल्ल गुडधे यांची उच्च न्यायालयात धाव

Show comments