Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जोडतोड आणि माघारी... कुठे दबाव तर कुठे आवाहन

Webdunia
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता सर्वच राजकीय पक्षांचे नेते वेगळ्याच कामाला लागले आहेत. हे काम आहे बंडखोरी म्हणून अपक्ष रिंगणात उतरलेल्यांना एकतर विनंती करून किंवा दबाव आणून माघार घेण्यास भाग पाडण्याचे !

या कामात पहिली बाजी मारली ती शिवसेनेने. या पक्षाचे नाराज शेखर सावरबांधे यांचे मन वळविण्यात आणि त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिष्टाई यशस्वी ठरली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या प्रयत्नांनाही बर्‍यापैकी यश आल्याचे चित्र आहे.

गिरीश व्यास अणि मोहन मते यांची मतपरिवर्तन करण्याचे भाजपने रविवारी प्रयत्न केले असून, व्यास आणि मते यांची माघार घेण्याची शक्यता बळावली आहे. रा. स्व. संघाच्या नेत्यांनीही या बंडखोरीची दखल घेत, बंडखोर स्वयंसेवकांना बोलावून माघार घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच कार्यकर्त्यांच्या बैठकाही सुरू झालेल्या आहेत.

आगामी काळ हा प्रचाराचा असल्याने प्रचाराची रणनीती कशी असावी, यावरही कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांशी सल्लामसलत करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

मुंबईच्या धारावीत भीषण अपघात, अनियंत्रित टँकरने वाहनांना दिली धडक

LIVE: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींची राजधानी दिल्लीसाठी मोठी घोषणा

इस्रायल-हमास युद्ध: इस्रायलने गाझामध्ये केलेल्या मोठ्या हवाई हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू

पुण्यात शरद पवार यांच्यासोबत छगन भुजबळ व्यासपीठ शेअर करणार

Show comments