Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प. महाराष्ट्रात कॉंग्रेसच्या दिग्गजांचा पराभव

वेबदुनिया
पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस वर्चस्वाच्या दूधसाखर प्‌टट्यातील बालेकिल्ल्याला प्रथमच शिवसेना- भाजप युतीने मोठे खिंडार पाडले आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात भाजपाच्या चार तर शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय विमान आमदार यांनी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी.एन.पाटील यांचा पराभव करुन साडेचार हजारहून अधिक मतांनी शिवसेनेचे चंद्रदिप नरके विजयी झाले आहेत. तर कोल्हापूर उत्तर मतदार संघातून राष्ट्रीय काग्रेसचे विमान आमदार मालोजीराजे छत्रपती यांचा पराभव करत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे ३६८७ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना एकूण ७०१२९ इतकी मते मिळाली आहेत. तर जनसुराज्य पक्षाचे रामभाऊ चव्हाण यांनी तीसर्‍या क्रमांकाची ५३०१ इतकी मते मिळवली.

हातकणंगले या नवीन मतदारसंघातून जनस्वराज्यचे विमान आमदार राजू आवळे आणि खासदार जयवंतराव आवळे यांचे सुपूत्र राजुबाबा आवळे या दोघा मातब्बरांचा पराभव करत शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर २३०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांचा हा विजय दिग्गज काँग्रेसी नेत्यांना झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सर्वांचे लक्ष वेधून राहीलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदार संघात शेवटच्या मतपेटीच्या मोजणी पर्यंत चुरस कायम राहीली अखेर उोगपती आणि रिडालोसचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा पराभव करत राष्ट्रीय काँग्रेसचे सतेज पाटील हे ५६५० मतांनी विजयी झाले. राज्याची मॅचिस्टर नगरी असणार्‍या इचलकरंजी विधानसभा मतदार संघात गेली वीस वर्षे असलेली आवाडे घराण्याची सत्ता संपुस्ष्टात आणत भाजपाचे सुरेश हाळवणकर हे विजयी झाले आहेत.

कागलमधून तीस हजाराहून अधिक फरकाने विमान राज्यमंत्री हसन मुश्रीफ हे ३०००० हून अधिक मत फरकाने विजयी झाले आहेत. आजरा चंदगड मतदार संघात विमान सभापती बाबा कुपेकर हे अवघ्या २३०० मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना गोपाळराव पाटील या उमेदवाराने कडवी लढत दिली. शाहूवाडी-पन्हाळा मतदार संघातुन जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक विनय कोरे हे ६००० हून अधिक मत फरकाने विजयी झाले आहेत. कोरे यांनी शिवसेनेचे विमान उमेदवार सत्यजित पाटील यांचा पराभव केला. राधानगरी मतदार संघातून के.पी.पाटील हे विजयी झाले असून यांना तिरंगी लढतीचा फायदा कळाला. राज्यातील सर्वाधिक ज्येष्ठ उमेदवार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सा.रे.पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवाराचा पराभव केला.

सांगलीत प्रथमच भाजप
सांगलीमध्ये प्रथमच भाजपाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सांगली शहर मतदार संघातून भाजपाचे संभाजी पवार हे विजयी झाले त्यांनी काँग्रेसचे दिग्गज उमेदवार मदन पाटील यांचा १११३३ इतक्या मतानी पराभव केला. मिरज मतदार संघातून भाजपाचे सुरेश खाडे हे दुसर्‍यांदा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बाळासाहेब बनमुडे यांचा ५४०० मतांनी पराभव केला. तर जत मधून धादायक विजयाची नोंद करत भाजपाचे प्रकाश शेंडगे हे ५४०० मतांनी विजयी झाले. त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष विलासराव जगताप यांचा पराभव केला.

शिराळा मतदार संघातून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मानसिंगराव नाईक हे विजयी झाले त्यानी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांना पराभुत केले. तर विमान मंत्री जयंत पाटील, आर.आर.पाटील आणि पतंगराव कदम हे अनुक्रमे इस्लामपूर , तासगाव, आणि पलूस-कडेगाव, या मतदार संघातून आपला विजय कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. जयंत पाटील यांंनी प्रारंभी चुरशीची लढत असे वातावरण निर्माण केलेल्या रिडालोसचे उमेदवार वैभव नायकवडी यांचा ५४००० हजारहून अधिक मतांनी पराभव केला. तर पतंगराव कदम यांनी बंडखोर उमेदवार पृथ्वीराज देशमुख यांचा पराभव केला. खानापूर - आटपाडी संघातून काँग्रेसचे सदाशिवराव पाटील हे विमान आमदार विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर अनिल बाबर यांचा पराभव केला.

सातार्‍यात आघाडीचेच वर्चस्व
सातारा जिल्ह्यात मात्र शिवसेना - भाजपाचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. चर्चीत कोरेगाव मतदार संघातून बंडखोर शालिनीताई पाटील यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे विजयी झाले. तर सातारा शहरातील अपेक्षेप्रमाणे विजेंद्रराजे भोसले हे विजयी झाले. तर फलटण मधून राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण, तर पाटण मधून विक्रमसिंह पाटणकर यांनी विजयी परंपरा कायम ठेवली. कराड दक्षिणमधून विलासराव पाटील (उंडाळकर) हे ज्येष्ठनेते सातव्यांदा विजयी झाले. त्यांनी हा विक्रम नोंदवताना विलासराव वठारकर यांचा पराभव केला. तर उत्तर मधून बंडखोर उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी विजय नोंदवत राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल भोसले यांचा पराभव केला. फलटण मतदार संघातून राष्ट्रवादीचे दिपक चव्हाण तर माण मतदार संघातून अपक्ष उमेदवार जयंतराव गोरे हे राष्ट्रवादीच्या सदाशिव पोळ यांचा पराभव करीत विजयी झाले.तर वाई मधून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला. तर सातारा जिल्ह्यामध्ये आपआपले गड राखण्यात राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशस्वी ठरले.
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

ठाण्यातील डॉक्टरने रुग्णाशी गैरवर्तन केले

ठाण्यातील कोचिंग सेंटरकडून जेईईच्या विद्यार्थ्यांची ३ कोटींची फसवणूक

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक दिल्लीत बांधणार

पालकमंत्र्यांची घोषणा कधी होणार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- मी राजीनामा दिला......

Show comments