Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजप- सेनेत फक्त भाऊबंदकी, गटबाजी- विलासराव

वेबदुनिया
शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भाऊबंदकी, भाजपमध्ये जिनाप्रकरणावरून चाललेला वाद, गडकरी मुंडे गटबाजी, पाडापडी याचीच चंगळ असून त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचा विजय निश्चित आहे असा विश्वास माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.

काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या प्रचारार्थ हिंगोली येथील महेश चौकात आयोजित जाहिर सभेत विरोधी पक्षाचा समाचार घेताना देशमुख म्हणाले की, शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू असलेल्या संघर्षात मराठी माणसाचा श्वास गुदमरतोय. तर भाजपाचे माजीमंत्री जसवंत सिंगांनी 'जिना'वरील पुस्तकाने भाजपातील नेत्यांचे जिणे मुश्कील झाले आहे. राज्यात गडकरी विरूद्ध मुंढे यांच्या गटबाजी, पाडापाडीच्या राजकारणाने भाजपातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विरोधी पक्ष सक्षम नसल्याने आगामी काळात आघाडीचेच सरकार राज्यात पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस सरकारने देशातील शेतकर्‍याच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. यानंतर सरसकट कर्जमाफीच्या माध्यमाने ६० हजार कोटी रुपये कर्ज माफ केले. आगामी काळात महिला बचत गटाची चळवळ पुढे रेटण्यासाठी आदिवासी महिला बचतगटास आणि मागासवर्गीय बचतगटास बिनव्याजी कर्ज दिले जाणार असून, काँग्रेसने ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकर्‍यांना ३ टक्के व्याज दराने देण्याची घोषणा आपल्या जाहिरनाम्यात केली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

SA20: पहिल्याच सामन्यात 28 वर्षीय खेळाडूचा मलिंगा-बुमराहच्या स्पेशल क्लबमध्ये प्रवेश

LIVE: शरद पवारांनी पक्षाच्या बैठकीत केली मोठी घोषणा

नागपुरात 3 रस्ते अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

विराट-अनुष्का यांनी वृंदावन जाऊन प्रेमानंद महाराजांची भेट घेत आशीर्वाद घेतले

मुंबईतील आरे कॉलनीतील झाडे तोडण्यापूर्वी परवानगी घ्यावी, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Show comments