Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात त्रिशंकू विधानसभेचे भाकीत

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2009 (14:03 IST)
राज्यात त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येणार असे भाकीत येथील राजकीय ज्योतिर्विद सिद्धेश्वर मारटकर यांनी नुकतेच व्यक्त केले आहे. पुणे येथे 'ज्योतिषज्ञान' या दिवाळी अंकाच्या प्रकाशनाप्रसंगी आयोजित परिसंवादात ते बोलत होते. राज्यातील विधानसभा निवडणुका आणि वार्षिक राशी भविष्य या विषयांवर या परिसंवादात चर्चा करण्यात आली. ज्योतिषज्ञान या अंकाचे प्रकाशन ज्येष्ठ कृषि तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते संपन्न झाले.

येत्या १३ ऑक्टोबरला होणारे मतदान आणि २२ ऑक्टोबरचा निकाल चार ह्या हर्षलच्या प्रभावाखाली लागणार असून विचित्र व अनपेक्षित निकालांची नोंद होणार असल्याचेही मारटकर यांनी म्हटले आहे. पक्ष आणि पक्षनेतृत्वांच्या पत्रिकांचा विचार करता, काँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती गत लोकसभेच्या तुलनेत खराब दर्शविते. त्यामुळे २००४ च्या इतक्या जागा राखण्यातही अडचणी येई शकतील. तिसरी आघाडी आणि बंडखोरीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा कमी होऊ शकतात असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना-भारतीय जनता पक्षांसंदर्भात मारटकर म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची पत्रिका निवडणूक काळात सुधारत असून सेनेच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. मात्र भाजपाच्या जागा कमी होऊन युतीला सत्तेपर्यंत जाणे अवघड असल्याचेही त्यांनी सांगितले.

याउलट कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाले तरी बंडखोर, तिसरी आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यासारख्या पक्षांची मदत घेऊन सत्ता मिळविण्यात आघाडीला यश मिळू शकते. मात्र त्यासाठी सत्तेतील महत्त्वांच्या पदावर तडजोड करावी लागेल आणि परिणामी राज्यात अस्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता सिद्धेश्वर मारटकर व्यक्त केली.

दरम्यान, या परिसंवादानंतर ज्योतिष परीक्षेतील उत्तीर्ण विार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पदवीप्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचा प्रारंभ पुरोहित शहरकर गुरूजी व सहकारी यांच्या मंत्र पठणाने झाला.
सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

Show comments