Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिडालोससाठी निवडणुकीतून माघार- सुलेखा कुंभारे

Webdunia
काँग्रेसी राजकारणाचा बळी ठरलेले डॉ. राजेंद्र गवई हे तिसर्‍या आघाडीतून बाहेर पडल्यामुळे आघाडीचे विदर्भातील काम आता मलाच पाहायचे आहे. ही जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी यावेळी निवडणूक न लढण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे, अशी माहिती एकीकृत रिपब्लिकन पार्टीच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी दिली.

दरम्यान, कालच रिडालोसची उमेदवारी यादी जाहीर झाली असून कामठी मतदारसंघासाठी सुलेखा कुंभारे यांचे नाव निश्चित करण्यात आले होते.

रिपाई ऐक्यामुळे कॉंग्र ेसचे धाबे दणाणले होते. विधानसभा निवडणुकीतील पराभव काँगे्रसला आतापासूनच दिसू लागला होता. त्यामुळेच या पक्षाने रिपाइंच्या ऐक्यात बिघाड निर्माण करण्याचे घाणेरडे राजकारण खेळले. या राजकारणात डॉ. गवई बळी पडले.

दुसर्‍या पक्षांमध्ये किंवा आघाडीत फूट पाडून त्यांना कमकुवत करण्याची काँगे्रसची ही जुनी खेळी असली तरी आमच्या आघाडीला आपण कमकुवत होऊ देणार नाही. आघाडी मजबूत करणे हाच आपला एकमेव उद्देश असून, यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सुलेखा कुंभारे यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्व पहा

नक्की वाचा

पापमोचनी एकादशी २०२५: योग्य तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

मंगळसूत्र आणि भांग भरणे विधी

शनी गोचरमुळे या ३ राशींचे भाग्य बदलेल, सूर्य आणि बुध ग्रहाच्या कृपेने ते होतील श्रीमंत

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

तेनालीराम कहाणी : तेनाली राम आणि रसगुल्लाचे मूळ

सर्व पहा

नवीन

LIVE: दिशा सालियन प्रकरणावर विधानसभेत चर्चा

पुण्यात पगार कपात वरून नाराज चालकाने स्वतः पेटवली बस, चार जणांचा मृत्यू

जागतिक वनीकरण दिन 21 मार्चला का साजरा केला जातो, इतिहास जाणून घ्या

UAE मध्ये 25 भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा

गोहत्या केल्यास 'मकोका' लागू केला जाईल, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Show comments