मुंबई: ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जागावाटपा संदर्भात हालचाली सुरु केल्या आहेत. तसेच भाजप या निवडणुकीत काही विद्यमान आमदारांची तिकीट कापणार असल्याचे विश्वसनीय चित्रांचे म्हणणे आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या झालेल्या बैठकीत काही विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची दाट शक्यता आहे. डच्चू देण्यात येणाऱ्या आमदारांची नावं अंतिम करण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय संयंसेवक संघाने काही जागांवरील बदलाची सूचना केली होती. तसेच, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांनाचा हिर्मुड हिण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे असे झाल्यास काही विद्यमान आमदारांना कार्यकर्त्यांप्रमाणे भाजपचे झेंडे हाती घ्यावे लागणार आहेत.
कोणाचे तिकीट कापले जाण्याची शक्यता?
राजकुमार बडोले- अर्जुनी मोरगाव
दिलीप कांबळे- पुणे छावणी
विलासराव जगताप- जत
शिवाजी कर्डीले- राहुरी
भारती लवेकर- वर्सोवा
कॅप्टन तामिळ सिल्वन – सायन कोळीवाडा
मंदा म्हात्रे – बेलापूर
संजय केळकर – ठाणे शहर
विष्णू सावरा- विक्रमगड
संगीता ठोबरे – केज
अनिल गोटे- धुळे शहर
देव्यांनी फरांदे- नाशिक
प्रकाश मेहता – घाटकोपर पूर्व
राम कदम – घाटकोपर पश्चिम
सरदार तारासिंग -मुलुंड
विद्या ठाकूर – गोरेगाव
डॉ.मिलिंद माने- नागपूर उत्तर
गोवर्धन शर्मा- अकोला पश्चिम
अमरीश आत्राम- अहिरे