प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतील बंडखोरी करत बाहेर पडलेले गोपीचंद पडळकर सोमवारी (30 सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करतील. पडळकरांनी अचानक वंचित बहुजन आघाडी सोडल्याने भिमसेना संतापली असून, भिमसेनेनं गोपीचंद पडळकरांना जोडे जोडाने मारणाऱ्यांना 50 हजार रुपयांच्या बक्षिसाची जाहीर केले.
पडळकरांवर वंचित बहुजन आघाडीचा विश्वासघात केल्याचा आरोप केला असून, पडळकरांनीही भूमिका स्पष्ट केली आहे. मी कुणाचाही विश्वासघात केलेला नसून, लोकशाहीमध्ये कुणी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे कुणाला गैरसमज होण्याचे कारण नाही, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. असे त्यांनी माध्यमांना सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले की, भारतीय जनता पक्ष मला ज्या ठिकाणाहून सांगणार त्या जागेवरून मी लढणार आहे. पक्षाने राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विरोधात उभं राहण्यास सांगितलं, तर तेथेही निश्चित उभं राहिल, असंही मत गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केले आहे.