Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

या तारखेला जाहीर होतील विधानसभा निवडणुका तारखा

या तारखेला जाहीर होतील विधानसभा निवडणुका तारखा
निवडणुका तारखा कधी जाहीर होतील अशी उत्सुकता सर्वाना आहे. त्यात राजकीय पक्षांनी तर अनेक उमेदवार ठेवले सुद्धा आहे. मात्र आता  सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या  तारखा जाहीर होणार आहेत असे जवळपास निश्चित झाले  आहे.

निवडणूक आयोगाची  बैठक होत असून, बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत सोबतच  तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा ,झारखंडचा समावेश  केला असून,  महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील. त्यामुळे आता लवकरच उत्सुकता संपणार असून, निवडणुकीचा धुराळा उडणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

परळचा राजा अडकला पुलाखाली, उंची मुळे निर्माण झाला अडथळा