Marathi Biodata Maker

कोकणात शिवसेना माझ्यामुळे रुजली मात्र आता खासदार भाजपाचे होणार

Webdunia
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019 (10:07 IST)
नारायण राणे शिवसेनेवर टीका करायची कोणतीही संधी सोडत नाहीत. आता पुन्हा त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेला कोकणात मी आणलं व रुजवले पण या पुढच्या वेळी कोकणात दोन्ही खासदार भाजपाचे असणार आहेत. असं त्यांनी सांगितले. राणे पुढे म्हणाले की मी येत्या आठ दिवसांत आपण भाजपात प्रवेश करणार आहे. भाजप पक्षात प्रवेश करण्यासंबंधी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे असे त्यांनी दावा केला आहे. सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.
 
नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करत भाजपामध्ये जाण्याबाबत कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतलं. तेव्हा त्यांनी सांगितले की आज सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यासोबत राहणार आहेत, तसंच येत्या आठ दिवसात भाजपामध्ये प्रवेश होईल असं त्यांनी सांगितलं आहे. राणे म्हणाले की, मी शिवसेना सोडली आणि माझ्यासोबत कार्यकर्तेही काँग्रेस पक्षात आले. त्यामुळे भाजपात जाईन तेव्हाही ते माझ्यासोबत असणार आहेत. भाजपात प्रवेश केल्यानंतर कोकणात पक्ष वाढवण्याचं काम आपण करु असं त्यांनी म्हटलं आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

गोरेगाव पश्चिम मध्ये चाळीत एलपीजी सिलेंडरचा स्फोट; 3 जण जखमी

लाजिरवाणी कृत्य; पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने महिला पत्रकाराला मारला डोळा, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेत रस्त्यावर विमान कोसळले, महिला चालक जखमी; व्हिडिओ पहा

LIVE: दारू दुकान उघडणे आता सोपे राहिलेले नाही उपमुख्यमंत्र्यांनी नवीन एनओसी नियम जारी केले

राज्यातील शाळा कॉलेज परिसरात गुटका विक्री रोखण्यासाठी मोका लागू करण्याची राज्य सरकारची घोषणा

पुढील लेख
Show comments