Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक नातू सुद्धा निवडणूक प्रचारात

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019 (15:29 IST)
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महायुतीची सभा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे आहे. उद्धव ठाकरे आज दुपारी हेलिकॉप्टरने सभास्थळी पोहोचले होते. सर्वात महत्त्वाचं असे की संगमनेरमधील मंचावर महायुतीच्या बड्या नेत्यांसह एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तो म्हणजे उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे होय.

तेजस ठाकरे सुद्धा महायुतीच्या सभेला वडलांसोबत हजर राहिले आहेत. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सभांच्या निमित्ताने आज कोल्हापुरात गेले आहेत. तर आदित्य ठाकरे कोल्हापुरात, तेजस ठाकरे संगमनेरमध्ये असं आजचं चित्र होते. एकीकडे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सक्रीय राजकारणातून संसदीय राजकारणात उतरले आहेत.

राज्यभर दौरा केल्यानंतर आदित्य ठाकरे आपण वरळीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. आदित्य ठाकरे यांनी माझ्यावर वरळीसह महाराष्ट्राची जबाबदारी असल्याचं म्हणत, राज्यभर प्रचाराला सुरुवात केली आहे.

एका बाजूने आदित्य तर दुसऱ्या बाजून उद्धव ठाकरे स्वत: प्रचार करत आहेत.  यावेळी उद्धव ठाकरेंच्या सोबतीला धाकटा चिरंजीव तेजस ठाकरे सुद्धा सोबत दिसत आहे. त्यामुळे आता तेजस सुद्धा राजकारणात प्रवेश करतील असे चित्र आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments