Festival Posters

किंक्रांत 2023:संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत, काय करावे, काय करू नये

Webdunia
सोमवार, 16 जानेवारी 2023 (11:53 IST)
संक्रांतीचा सण संपूर्ण देशात उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो. मकर संक्रांतीचा आदल्या दिवशी भोगी असते. या दिवशी भोगीची भाजी,बाजरीची भाकरी असा बेत केला जातो. भोगीचा पुढचा दिवस मकर संक्रांति असते. या दिवशी सवाष्ण बायकांना बोलवून हळदी कुंकू  समारंभ करून इच्छेनुसार सवाष्णींना वाण दिले जाते. लहान मुलांचे बोरन्हाण देखील या दिवशी केले जाते.संक्रांतीच्या दिवशी आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ तिळाचे लाडू, वड्या किंवा तिळाचा हलवा आणि स्त्रियांना वाण देऊन  'तिळगुळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याच्या शुभेच्छा देतात.
 
मकर संक्रांति चा दुसरा दिवस किंक्रांत किंवा करिदिन म्हणून साजरा केला जातो. 
या दिवशी कोणतेही शुभ काम करणे निषिद्ध मानले आहे. या दिवशी देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचे वध केले होते. देवीआईची पूजा अर्चना करून देवीला नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही ठिकाणी प्रवास करत नाही. दक्षिण भारतात मकर संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो. या दिवशी गाई- बैलांना स्नान घालून त्यांची पूजा करून गोडधोडाचा जेवण देतात आणि संध्याकाळी गावात मिरवणूक काढतात. या दिवशी देखील बायका हळदी कुंकू करतात. संक्रांतीचा सण रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. बायका हळदी- कुंकूचा समारंभ रथ सप्तमी पर्यंत करतात. 
 
 
 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

अपरा एकादशी व्रत कथा Apra Ekadashi 2026 Vrat katha

Apara Ekadashi Vrat 2026 अपरा एकादशी पूजा विधी तसेच महत्त्व जाणून घ्या

युगे अठ्ठावीस विठ्ठल आरती

आरती बुधवारची

श्री विष्णूची आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

पुढील लेख
Show comments