धर्म शास्त्राप्रमाणे तीळ दान केल्याने शनीचा दुष्प्रभाव कमी होतो. तिळाचे सेवन आणि तीळ मिश्रित पाण्याने स्नान केल्याने पाप नष्ट होतात, निराश मिटते. श्राद्ध आणि तर्पणमध्ये तिळाचा प्रयोग दुष्ट आत्मा, दैत्य, राक्षस यांपासून बाधा होण्याची भीती दूर होते. तसेच माघ मासमध्ये रोज तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करणार्यांचे सर्व कष्ट दूर होतात असे मानले जाते. याने राहू आणि शनीचा दोषदेखील नष्ट होतात.
वैज्ञानिक कारण:
नदीत अंघोळीचे महत्त्व
या दिवसात नद्यांमध्ये बाष्प क्रिया होते ज्याने सर्व प्रकाराचे आजार बरे होऊ शकतात. म्हणून या दिवशी नद्यांमध्ये स्नान करण्याचं महत्त्व आहे.
तिळगुळाचे महत्त्व
मकर संक्रांती सणात तीळ आणि गूळ याचे सेवन करण्यामागे वैज्ञानिक कारण आहे की याने शरीराला ऊर्जा मिळते. हिवाळ्यात शरीराच्या सुरक्षेसाठी याची फार गरज असते. या दिवसात शरीराचे तापमान आणि बाह्य तापमानामध्ये संतुलन करायचं असतं.
तीळ आणि गूळ गरम पदार्थ असल्याने याने शरीराला उष्णता लाभते. या मोसमात तिळगूळ खाल्ल्याने सर्दी- खोकला या आजारात आराम मिळतो.
अँटीऑक्सीडेंटप्रमाणे काम करतात तीळ
तिळामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, ट्रायओफॅन, आयरन, मँगेनिझ, कॅल्शियम, फॉस्फरस, जिंक, व्हिटॅमिन बी 1 आणि फायबर्स भरपूर प्रमाणात आढळतात. एक चतुर्थांश कप किंवा 36 ग्रॅम तिळाच्या बियांनी 206 कॅलरी ऊर्जा प्राप्त होते.
गठिया आजाराने त्रस्त लोकांना तिळाने फायदा होतो. तीळ अँटीऑक्सीडेंट गुण आढळतात. तीळ शरीरात आढळणारे जिवाणू आणि कीटक नष्ट करतं. तसेच संक्रांती सणादरम्यान खिचडी सेवक करण्यामागेदेखील एक वैज्ञानिक कारण आहे. खिचडी पचन क्रिया सुरळीत ठेवते. यात आलं, मटार मिसळल्याने रोग-रोग प्रतिकारशक्ती वाढवते.