Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मकर संक्राती : आवर्जून करा ही कामे

मकर संक्राती : आवर्जून करा ही कामे
, मंगळवार, 12 जानेवारी 2021 (14:24 IST)
या दिवशी दान केल्याने शंभरपटीने फल प्राप्ती होते. अशात यशा शक्ती दान करावे.
 
या दिवशी सूर्यदेवता आणि भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि‍ शिवाची पूजा करणे शुभ ठरेल.

या दिवशी सूर्यदेव शनीदेवाच्या राशी मकरमध्ये प्रवेश करतात. दोघांमध्ये पिता-पुत्र असे नाते आहे त्यामुळे या दिवशी घरातील वडीलधार्‍यांचे आशीर्वाद घ्यावे.
 
या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. केरसुणीत लक्ष्मीदेवीचा वास असल्याचे सांगितले जाते. अशात या दिवशी केरसुणी खरेदी केल्याने घरात 
 
सुख-समृद्धी येते.
 
मकर संक्रातीला गायीला चारा खाऊ घालावा.
 
या दिवशी तुळशीचे रोप लावावे.
 
या दिवशी तीळ आणि खिचडी दान करावी.
 
सूर्याची कृपा मिळविण्यासाठी संध्याकाळी अन्न सेवन टाळावे.
 
या दिवशी गरजू लोकांना रिकाम्या हाती पाठवू नये.
 
या दिवशी दान करण्याचे महत्त्व असले तरी दानमध्ये दिली जाणारी वस्तू आणि दान घेत असलेली व्यक्ती योग्य असणे गरजेचे आहे.
 
या दिवशी झाडांना ओरबाडू नये. उलट नवीन झाडे रोपावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्री चिंतामणी