Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त अमळनेरचे मंगळ ग्रह मंदिरात रामनामाचा गजर

Ramnavami puja
अमळनेर :- प्रभू श्रीराम यांच्या राम जन्मोत्सवानिमित्त अमळनेर येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात आज दिवसभर रामनामाचा गजर करत उत्साहात रामजन्मोत्सव भक्तीमय वातावरणात पार पडला. 
 
श्रीराम नवमीनिमित्त गुरूवारी ३० मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव विधिवतरीत्या सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांच्या बालमूर्तीचे पूजन झाले. पूजेनंतर पाळणा व महाआरती प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडली. या पूजेचे मुख्य मानकरी अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी सहपत्नीक उपस्थित होते. या पूजेची पुरोहित्य मंदिराचे प्रसाद भंडारी तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य व मंदार कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त अनिल अहिरराव,सेवेकरी विनोद कदम, जी.एस.चौधरी आदींसह भाविक उपस्थित होते. राम जन्मोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली होती. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

26 एकादशी आणि 26 लाभ, जर तुम्ही व्रत केले तर तुम्ही आयुष्यभर सुखी आणि श्रीमंत राहाल