कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती जालन्यातील मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनस्थळी भेट दिली. आंदोलन स्थळी पोहोचून त्यांनी मनोज जरांगे- पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची ही विचारपूस केली. तुम्ही आहात म्हणून मराठे आहेत असे गौरवोद्गार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मनोज जरांगे यांच्याविषय़ी काढले आहेत. तर श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या येण्याने आंदोलनाला बळ मिळाल्याची भावनाही मनोज जरांगे- पाटील यांनी व्यक्त केले. दोन दिवसात जर सरकारने आरक्षण दिले नाही तर आपण पुन्हा पाणी पिणार नाही असेही मनोज जरांगे- पाटील यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांना सांगितले.
जालन्यातील आंतरवली सरटी येथे मनोज जरांगे- पाटील यांनी आंदोलन सुरु केले आहे. आजच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत खुपच खालावली असल्याचे समाज माध्यमांमध्ये दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्रात विविध ठिकाणी तणाव दिसून येत आहे. या पार्श्वभुमीवर कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती मनोज जरांजे यांच्या तब्येतीची चौकशी आणि विचारपूस करण्यासाठी जालन्याकडे आज सकाळी रवाना झाले होते.