Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकार असंच खेळवत राहिलं तर मी डायरेक्ट विधानसभेला उभं राहिन- मनोज जरांगे पाटील

Webdunia
बुधवार, 12 जून 2024 (19:19 IST)
जालन्यातील अंबड तालुक्यात अंतरवाली सराटी इथं उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सरकार आम्हाला खेळवत राहिलं तर मी विधानसभेला उभं राहिन असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
ते म्हणाले, उपोषण असे कसे स्थगित होईल, त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवून जाहीर करावं की हे किती दिवसात करतील57 लाख नोंदी मिळाल्यात त्याच्या आधारे कायदा किती दिवसात पारित करतील किती दिवसात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील? हे स्पष्ट करायला हवं उपोषण स्थगित होईल पण.... किती दिवसात करणार आहेत ?का लगेच करणार आहेत?असे अनेक प्रश्न आहेत.
ओबीसी नेते स्वतःला प्रगल्भ विचारायचे म्हणून घेतात आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार म्हणतात जिथे तेढ निर्माण होईल तिथे तुम्ही बसणार का शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेऊन नुसते भाषण ठोकतात.
 
हे सरकारचं षड्यंत्र आहे मुख्यमंत्र्याला आम्ही चांगलं मानतो शिंदे साहेबांना आजपर्यंत आम्ही चांगलं मानतो. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती ?काय काय आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत. ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत मुळात म्हणजे ओबीसींना धक्काच लागत नाही ओबीसींचा याच्याशी संबंध येत नाही मराठा हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे ते जाणून-बुजून समाजात तेढ निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगलं मानतो मात्र त्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत मुंबई संपली आता दिल्लीला पळत आहे, काय साचा बनवून आणला असेल मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी.
 
वेळोवेळी असंच होत राहिले तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल असेच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेन.
 
मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी असंच उपोषण स्थगित करू शकत नाही, काही गोष्टी डिटेल्स मध्ये माहिती झाल्या पाहिजेत सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का किती दिवस सात करणार आहेत केसेस लगेच मागे करणार की किती दिवसात करणार हे मला डिटेल पाहिजे
 
आम्ही थोडे दिवस उपोषण करू आम्ही तरी किती दिवस उपोषण करणार तुम्ही जाणून-बुजूनच आम्हाला मारायला निघाला असता तर लागतील गोरगरीब मराठी सर्व जाती धर्माचे लोक विधानसभेच्या तयारीला. एवढा मोठा विषय मराठ्यांच्या आयुष्याचा आहे ,लांबून गोळ्या मारून होत असतं का ?प्रत्यक्ष चर्चा करूनच होईल माझ्या मते प्रतिक्षा चर्चा करून विषय गोडी गुलाबीने हाताळा उगाच तयारी नका करू जाळ रचून षडयंत्र रचून.
 
मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या आमचा शिंदे साहेबावरती सरकार वरती आजही विश्वास आहे देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत आमचे हे मी मागे सांगितलं आहे ते कार्य करतात ते आपल्याला जमत नाही, जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही त्यांनी हे सर्व बंद करावं ते काय माझे शत्रू आहेत का?
 
आमचा सगळ्यांवरतीच विश्वास आहे आम्हाला आरक्षण द्या कोणीही द्या मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील.
 
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments