Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठा आरक्षण: दोन छत्रपती राजघराने 300 वर्षानंतर एकत्र आले

Webdunia
मंगळवार, 15 जून 2021 (14:22 IST)
'दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. पाच मागण्या राज्य सरकारकडे केल्या आहेत, त्या त्यांच्या हातात आहेत, त्यांनी लवकर त्या मार्गी लावाव्यात,' असं संभाजीराजेंनी म्हटलंय.
 
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आज (14 जून) खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती भेटले. पुण्यामध्ये उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात ही बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी सविस्तर चर्चा झाली. या बैठकीनंतर उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
'आता लोकप्रतिनिधींनी यावर बोलण्याची वेळ आली आहे, विशेष अधिवेशनाच्या माध्यमातून तोडगा निघू शकतो,' असं संभाजीराजे यांनी म्हटलं.
'संभाजीराजेंनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे, सध्याचे राजकारणी देशाची फाळणी करण्याच्या विचारात आहेत,' असा आरोप यावेळी उदयनराजेंनी केला आहे. 'राजकारण्यांची मराठ्यांना आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नाही, यातून लोकांचा मोठा उद्रेक झाला तर त्यांना कुणीही थांबवू शकणार नाही,' असंही यावेळी उदयनराजेंनी म्हटलंय.
 
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यव्यापी दौरा केल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी संभाजीराजेंनी चर्चा केली आहे.
 
16 जूनपासून आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणार असल्याचंही संभाजीराजेंनी जाहीर केलं आहे.
विशेष म्हणजे आजच (14 जून) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू यांची भेट घेतली होती.
या सर्व पार्श्वभूमीवर उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होत आहे, याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, शाहू महाराज छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोल्हापुरात न्यू पॅलेस इथं भेट झाली.
16 जून रोजी मराठा मूक मोर्चा
लाखोंच्या संख्येने 58 मूक मोर्चे काढणारे मराठा समाज बुधवारी (16 जून) पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहे. संभाजी राजे यांनी जाहीर केले आहे की 16 जून रोजी कोल्हापूरच्या टाऊन हॉल भागात छत्रपती शाहूजी महाराजांच्या समाधीस्थळावरून एक विशाल मोर्चा काढला जाईल. छत्रपती शाहूजी महाराजांची ही भूमी आहे, जिथे त्यांनी बहुजन समाजाला प्रथमच आरक्षण दिले होते. यानंतर नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगड जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार जागे झाले नाही तर पुण्याहून मुंबईत मंत्रालयात मूक मोर्चेबांधणी होईल. ते म्हणाले की मराठा आरक्षणासंदर्भात माझ्या सहा मागण्या आहेत, त्या मान्य केल्या पाहिजेत.
 
दोन राजघराण्यांमधील वाद काय आहे
1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर सातारा आणि कोल्हापूर रॉयल्टी दरम्यानचा वाद सुरू झाला. इतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या मते शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा शाहूजी महाराजांना मोगलांनी कैदेत टाकले होते. औरंगजेबच्या मृत्यूनंतर शाहूजी महाराज महाराष्ट्रात परतले तेव्हा छत्रपती राजाराम आधीच मरण पावले होते. त्याची आई ताराराणी यांनी हे राज्य साहुजीकडे देण्यास नकार दिला. तर मराठ्यांनी सहजीचे स्वागत केले. 1707 मध्ये संभाजीने खेडाच्या लढाईत ताराराणीचा पराभव केला आणि 1708  मध्ये छत्रपती झाले. दुसरीकडे, 1714 मध्ये छत्रपती राजारामची दुसरी पत्नी राजाबाई यांनी संभाजी द्वीतीय च्या नावाने आपला मुलगा छत्रपती म्हणून घोषित केले. तथापि, 1731 मध्ये शाहूजी महाराजांनी कोल्हापुरात संभाजी द्वितीयचा अधिकार ओळखला परंतु सातारा आणि कोल्हापूरमधील वाद कायम राहिले

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments