- राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतंर्गत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 605 अभ्यासक्रमांमध्ये सवलती मिळणार आहेत.
- शिष्यवृत्तीसाठी 60 टक्क्यांची अट काढून 50 टक्के करण्यात आली आहे.
- ओबीसी विद्यार्थ्यांना जितक्या सवलती तितक्याच सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत.
- मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधणार त्यासाठी 5 कोटी देण्यात येतील.
- सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अनुकूल असून, सध्या हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे आहे.
- कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.
- तीन लाख मुलांना कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत प्रशिक्षण देणार
- मंत्रिमंडळाची उपसमिती तयार करण्यात येईल. ही उपसमिती आणि मराठा समिती दर दोन ते तीन महिन्यांनी चर्चा करतील.