Dharma Sangrah

नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांचा राजीनामा

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 (21:19 IST)
मराठा आरक्षणासाठी नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गेल्या ४८ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलकांना भेटण्यासाठी खासदार हेमंत गेाडसे आले होते. त्यावेळी आंदोलकांनी गोडसे यांना जाब विचारत समाजासाठी राजीनामा द्या अशी मागणी केली होती.त्यानुसार हेमंत गोडसे यांनी राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला आहे.
 
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर नाशिकमध्ये आंदोलन सुरू करण्यात आले होते. दोन दिवसांपासून आंदोलकांपैकी नाना बच्छाव यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दिवसेंदिवस नाशिकमध्ये आंदोलन तीव्र होत असून दीडशेहुन अधिक गावांत राजकीय नेते आणि मंत्र्यांना गावबंदी करण्यात आली आहे. उलट समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांचे दौरे आणि कार्यक्रम रद्द होत आहेत. याच ठिकाणी खासदार गोडसे आंदोलकांना भेटण्यासाठी आले असता आंदोलकांनी संताप व्यक्त केला.
त्यानंतर आंदोलकांनी गोडसे यांना समाजासाठी तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला आम्ही पुन्हा निवडून आणू असे सांगितले. यानंतर खासदार हेमंत गोडसे यांनी पक्षाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडे राजीनामा दिला असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पाऊले उचलावित अशी मागणी केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षण कर्मचाऱ्यांनी ८ डिसेंबरपासून तीव्र आंदोलनाची घोषणा केली

बीएमसीने मुंबईकरांसाठी ५ ते ७ डिसेंबरपर्यंत भरती-ओहोटीचा इशारा जारी केला

मोहम्मद शमीने निवडकर्त्यांना त्याच्या कामगिरीने चोख प्रत्युत्तर दिले, SMAT २०२५ सामन्यात धुमाकूळ घातला

निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात खळबळ उडाली; चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, "सरकारचा कोणताही सहभाग नाही"

पुण्याच्या नवले पूल दुर्घटनेचा मुद्दा सुप्रिया सुळेंनी संसदेत उपस्थित केला, नितीन गडकरींनी दिले उत्तर

पुढील लेख
Show comments