Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राजकीय इच्छाशक्ती शक्ती नाही म्हणून आरक्षण नाही - उदयन राजे

राजकीय इच्छाशक्ती शक्ती नाही म्हणून आरक्षण नाही - उदयन राजे
, शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (11:20 IST)
पुन्हा एकदा उदयन राजे मराठा नेत्यांवर टीका केली आहे. त्यांनी मराठा आरक्षण का मिळाले नाही यासाठी नेत्यांना जबाबदार ठरविले आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेली आंदोलनाची परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नाही. काही अनुचित घडण्यापूर्वी सरकारने निर्णय घ्यावा असे खासदार उदयनराजे यांनी वक्तव्य केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपले मात्र व्यक्त केले आहे. उदयन राजे  म्हणाले की राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यानेच मराठा आरक्षण लांबणीवर पडलं असे चित्र स्पष्ट आहे, कुणाचाही विरोध नसताना आरक्षण का दिलं नाही? इतकी वर्षे मराठा आरक्षणाचा मुद्दा का प्रलंबित ठेवला? असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. 
 
ॲट्रॉसिटी कायद्याबाबात जेवढी तत्परता दाखवली तेवढीच तत्परता मराठा आरक्षणसाठी केंद्र सरकारनेही दाखवावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  घटना ही माणसांनी माणसांसाठी लिहिली. 58 मूक मोर्चे विराट निघाले तेव्हा काहीच घडले नाही. आता निघणारे मोर्चे खूपच छोटे आहेत, त्यामुळे हे का घडत आहे याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा असे उदयनराजे म्हणाले.उदयनराजे म्हणाले की, आम्हालासुद्धा समान न्याय मिळावा इतकीच माफक अपेक्षा आहे. मराठा आरक्षण परिषद भरवून सर्व समन्वयकांचे मत जाणून घेणार आहोत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी सरकारने त्वरित निर्णय घ्यावा असे उदयनराजे म्हणाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहरुखची सिग्रेचर पोझ वाहतूक नियंत्रणात उपयोगी