Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आरती शुक्रवारची

Webdunia
शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (07:15 IST)
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥
अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥
सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥
चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥
स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्‌वृत्ती ॥
व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥
सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥
पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥
ह्मणऊनि सहचराचरी साधिती निज काज ॥
ऐसा परात्पर हा विघ्नराज ॥जयदेव० ॥२॥
सकळा देवामाजि तूं वक्रतुंड ॥
दोष छेदन कानीं होसी प्रचंड ॥
ध्यानीं अवलोकितां पूर्ण ब्रह्मांड ॥
शास्त्रादिक शोधितां निगमागम कांड ॥जयदेव० ॥३॥
सुखदासन मनमोहन फणि भूषण धारि ॥
हरनंदन सुरवंदन अघकंदनकारी ॥
मयुर वाहन पावन नयन त्रिधारी ॥
सादर वरद भक्तां होय विघ्नहारी ॥जयदेव० ॥४॥
गुरुवर कृपें योग दिसे अभेद ॥
पाहातां सर्वांठायीं हा मूळकंद ॥
पठण करितां योगीं निज चतुर्वेद ॥
विनवी चिंतामणी निजभावें वरद ॥जयदेव० ॥५॥

संबंधित माहिती

शनिवारची आरती

भक्ताची हाक देवापर्यंत पोहचवतात देवर्षी नारद

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

Santoshi Mata Vrat संतोषी देवी व्रत केल्याचे 6 फायदे

Lakshmi Kripa देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम ठेवायचा असेल तर वास्तूचे हे नियम नक्की लक्षात ठेवा

होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे 29 मे पर्यंत पोलीस कोठडीत

अमरावतीमध्ये हिट अँड रन प्रकरण, दुचाकीस्वाराला कारची धडक,मृत्यू

Maharashtra Heatwave : अकोल्यात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद, कलम 144 लागू

'कितीही पैसे दिले तरी आता ते लोक परत येतील का?' राजकोट आगीतील पीडितांच्या नातेवाईकांचा सवाल

KKR vs SRH Final: आज कोलकाता आणि सनरायझर्स हैदराबादचा फायनल सामना, कोलकाता संघ तिसऱ्यांदा विजेतेपदासाठी प्रयत्नशील

पुढील लेख
Show comments