rashifal-2026

आरती संतांची

Webdunia
मंगळवार, 8 जुलै 2025 (17:56 IST)
आरती संतमंडळी।।
हाती घेउनि पुष्पांजळी।।
ओवाळीन पंचप्राणे।।
त्यांचे चरण न्याहाळी।।ध्रु.।।
 
मच्छेद्र गोरक्ष।
गैनी निवृत्तीनाथ।।
ज्ञानदेव नामदेव।।
खेचर विसोबा संत।।
सोपान चांगदेव।।
गोरा जगमित्र भक्त।।
कबीर पाठक नामा।।
चोखा परसा भागवत ।। आरती.।।1।।
 
भानुदास कृष्णदास।।
वडवळसिद्ध नागनाथ।।
बहिरा पिसा मुकुंदराज।।
केशवस्वामी सूरदास।।
रंगनाथ वामनस्वामी।।
जनजसवंत दास ।। आरती.।।2।।
 
एकनाथ रामदास।।
यांचा हरिपदी वास।।
गुरूकृपा संपादिली।।
स्वामी जनार्दन त्यास।।
मिराबाई मुक्ताबाई।।
बहिणाबाई उदास।।
सोनार नरहरी हा।।
माळी सावता दास ।। आरती.।।3।।
 
रोहिदास संताबाई।।
जनी राजाई गोणाई।।
जोगा परमानंद साळ्या।।
शेख महंमद भाई।।
निंबराज बोधराज।।
माथा तयांचे पायी।।
कूर्मदास शिवदास।।
मलुकदास कर्माबाई ।। आरती.।।4।।
 
नारा म्हादा गोदा विठा।।
प्रेमळ दामाजीपंत।।
तुकोबा गणेशनाथ।।
सेना नरसी महंत।।
तुळीसीदास कसबया।।
पवार संतोबा भक्त।।
महिपती तुम्हापासी।।
चरणसेवा मागत ।। आरती.।।5।।

********************

गुण आणि गंभीर रणधीर । तया योग्य साजे कशव शरीर । तैसा अमृतराज हा विसोबा खेचर । बोलोनि अबोलणा न कल्पी ऐसा सार ॥१॥
जयजय आरती या हरिदासांच्या भक्ता । दिंडी पुढें डोलत गाती पंढरिनाथा ॥ध्रु०॥
हरीदासा महिमा न वर्णवे वाचा ।  पतिता उद्धरण जाणविला साचा ।
त्याचा दासीपुत्र होय तो दैवाचा । म्हणोनि संतचरणीं भाव धरावा साचा ॥२॥
साधु संताघरीं श्वान मी होईन । मग त्यांच्या पायीं नित्य लोळेन ।
हरिभक्ति सोय तेमी लाभेन । तयांचें पोसणें कैं मी होईन ॥३॥
दूध देखोनि जैसी मांजर सोय । तैसे न संडवति या संतांचे पाय ।
चालतां तया संगें मद मत्सर जाय । म्हणोनि आवडी त्यांचे धरावे पाय ॥४॥
तैसी आरती हे अमृतराज । गालां उन्मेष उन्मनी सहज ।
सत्नावीचें वोळलें अमृत मज । धन तृप्तितीर जोडलें सहज ॥५॥
यांची कृपा तरी सार्थक जन्म । नाहीं तरी निरर्थक होईल जाण ।
विष्णुदास नामा म्हणे नेणते अज्ञान । केशव चरणीं ठेवूनि केलें सार्थक निर्वाण ॥६॥
 
*****************
 
क्षार उदक देउनी मधुरता आली । तैसी लवणस्थिति अमृत खोली । तयांच्या अंतरीं प्रवृत्ति मुराली । परी साखरेची मौल्यता कवणें आणिली ॥१॥
जयजय आरती प्रेम सिंधुपुरा । ऐक्या ऐक्या केलें तुवां येकसरा ॥२॥
नित्य प्रेमें जागती जागरणी जागा । आणिक उद्धरण जगासी सांगी ।
येकि येकादशी पुण्य आलें तें पहागा । द्वादशी लाधली ते भक्तासी मागा ॥३॥
ऐसे परौपकारीं लोळावें त्यांचे द्वारीं । तेंचि केशवध्यान येर लटिकें संसारीं ।
त्यांचे रंगणीची शीळाइंद्रायणीचे तटी वरिला रहिवास ।
विश्व तारावया लक्ष्मी निवास । ज्ञानेश्वररूपें धरिलें निज वेष । वर्म जाणें तया सद्रुरु उपदेश ॥१॥
जयदेव जयदेव जय ज्ञानदेवा । जीवा शिवाचा आदि परब्रम्हा ठेवा ॥ध्रु०॥
एकादशा कार्तिकमासीं । आपण पंढरिनाथ सनकादिकांसी ।
यात्रेसी येता ती स्वानंदरासी । दर्शन घडे तयां निजमुक्ति देसी ॥२॥
म्हैसिक पुत्र केला वाचक वेदाचा । प्रतिष्ठानीं गर्व हरिला विप्रांचा ।
विशेष अर्थ केला अगवद्रीतेचा । प्रत्यक्ष द्वारीं शोरे पिंपळ कनकाचा ॥३॥
सनकसिंद्धगणांमाजी तूं श्रेष्ठ । ज्ञानावरी माजी ज्ञानवरिष्ठ ।
अनुताप दीप्ति विश्व घनदाट । नामयावरि लोटॆ प्रेमाचा लोट ॥४॥
 देवा मज करीं । नाहींतरी व्यर्थ जन्मोनी पशुपरी ॥४॥
पूर्वज उद्धरण दिसे विकुंठ वाटे । हरिदा साचे भार मीरवती गरुड टके गोमटे ।
धन तृप्तितीर बरवें वाळुवंटें । वैष्णव रंगीं नाचतां  हर्ष बहू वाटे ॥५॥
लाधलों समसुख काशीये जातां । विश्वनाथ प्रेम प्रेमाचिया सत्ता ।
बाणली वीरथी पंढरीनाथा । जिकडे तिकडे देखें हरीदास गर्जतां ॥६॥
निवृत्ति सोपान हे ज्ञानेश्वरु । चांगदेव मुक्ताई वटेश्वरु ।
अवघीया अवघा साक्षात्कारु । सद्रुरु जाण तो विसोबा खेचरू ॥७॥
त्याचे चरणीचा रजरेणू हा नामदेव शिंपा । पाहांता अनुभव सकळार्थ सोपा ।
विठ्ठल कृपेस्तव यांची मजवरी कृपा । हे एकची मूर्ति पावलों ऐसें देखोपां ॥८॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shiv Chalisa शिव चालीसा पाठ करा, इच्छित परिणाम मिळवा

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

रविवारची आरती.... जयदेव जयदेव जय (श्री) म्हाळसापती

६ जानेवारी रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी, व्रत- पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

रविवारी करा आरती सूर्याची

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

पुढील लेख
Show comments