Festival Posters

श्री श्रीधरस्वामींची आरती

Webdunia
बुधवार, 2 ऑगस्ट 2023 (14:20 IST)
जयदेव जयदेव सद्गुरु श्रीधरा। स्वामी श्रीधरा। आरती ओंवाळूं तुज परात्परा।। जय.।। ध्रु.।।
 
अनंत अक्षय अद्य अपार आनंदा। भक्तोद्धारासाठी होसी मूर्तसदा।
अपार कीर्ती तव हि न कळे स्मतिवेदा। भक्ता अभय दे‍ऊनि मिळविसी त्वत्पादा ।।1।।।
 
त्रिगुणी सचराचरी तूं सर्वव्यापी। पतीतपावन करण्या ज्ञानामृत ओपी।
स्वयंब्रह्म साक्षात् श्रीधररुपी। मानवतनु धारी हा ब्रह्मस्वरुपी ।।2।।
 
चिन्मय त्रिगुणातित त्रिलोक पालक। सचराचरी व्यापक तूं परिपूर्ण एक।
धमाधर्म निमित्त केवळ निष्टंक। भववारिधी तारु तूं सकळासी एक ।।3।।।
 
सत्यज्ञानानंद ब्रह्मचि सदा। जीवेशाही सर्व ही निरवुनिया भेदा।
निजपदी रमवुनि जो का घालवो आपदा। तो हा श्रीधर वंदू तारित जो बद्धा ।।4।।
 
ओवाळावी तव या चरणी मम काया। अहं मति ही सारी निरसी गुरुराया।।
तारी तारी माते सोडून हि माया। मम मानस मिळवी हे चिन्मय तव पाया ।। 5।।

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Margashirsha Guruvar 2025 Wishes in Marathi मार्गशीर्ष गुरुवारच्या शुभेच्छा

घरात अश्या प्रकारे कापूर जाळल्याने सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती मिळेल

Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी

आरती बुधवारची

Budhwar Upay: बुधवारी या वस्तूंचे दान करणे करिअरसाठी शुभ

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments