Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

।। श्री दत्तगुरूंची आरती श्री गुरु दत्तराज मूूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती ।।

Shri Datta Ashtakam
बुधवार, 15 मार्च 2023 (19:27 IST)
श्री गुरु दत्तराज मूूर्ती, ओवाळितो प्रेमे आरती 
ब्रम्हा, विष्णू, शंकराचा, असे अवतार श्रीगुरुचा
कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि ऋषिचा 
धरीला वेष असे यतिचा मस्तकी मुकुट शोभे जटिचा
कंठी रुद्राक्ष माळ धरुनी 
हातामधे आयुध बहुध धरुनी 
तेणे भक्तांचे क्लेश हरुनी
त्यासी करुनी नमन, अथ शमन होईल रिपु दमन,
गमन असे त्रैलोक्या वरती । ओवाळितो प्रेमे आरती ।। १ ।।
गाणगापुरी वस्ती ज्याची, प्रीति औदुंबर छायेसी 
भीमा अमर संगमाची भक्ति असे बहुत सुशिष्यांची 
वाट दावूनिया योगाची, ठेव देत असे निज मुक्तिची
काशी क्षेत्री स्नान करितो 
करविर भिक्षेला जातो 
माहुरी निद्रेला वरितो
तरतरीत छाटी झरझरीत नेत्र गरगरीत शोभतो 
त्रिशुळ जया हाती, ओवाळितो प्रेमे आरती ।। २ ।।
अवधूत स्वामी सुखानंदा, ओवाळितो सौख्यकंदा
तारी हा दास रूदनकंदा, सोडवी विषय मोह छंदा
आलो शरण अत्रिनंदा, दावि सद्गुरू ब्रह्मानंदा
चुकवी चौऱ्यांशीचा फेरा 
घालिती षडरिपु मज घेरा 
गांजिती पुत्र पौत्र दारा
वदवी भजन मुखी तव पुजन करितसे
सुजन ज्यांचे बलवंतावरती, ओवाळितो प्रेमे आरती ।। ३ ।।
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ram Navami 2023 अनेक शुभ संयोगाने साजरी होणार रामनवमी, अनेक दशकांनंतर असा दुर्मिळ योग