Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुलांकानुसार फलादेश 2010

भारती पंडित

Webdunia
ND
वर्ष 2010च्या अंकांची बेरीज केली तर 2+0+1+0= 3 येते. अर्थात 2010 हे मुलांक 3 आहे. म्हणून या मुलांकाचे व इतर मुलांक असणार्‍या व्यक्तींना येणारे वर्ष कसे जाईल, हे आता आपण पहाणार आहोत.

मुलांक 1 : महत्त्वाकाक्षांवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. आत्मस्तृत‍ि करणे टाळावे. सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरु अथवा वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे. शुभ वार्ता कळतील.

मुलांक 2 : वर्षाच्या प्रारंभी अडचणी सोडवाव्या लागतील. आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी लागेल. काळजीपूर्वक कामे करा. शक्यतो, महत्त्वाचे कामे पुढे ढकलण्यास हरकत नाही.

मुलांक 3 : कुटुंबात मंगलकार्य जुळतील. व्यापार-व्यवसायात वातावरण अनुकूल राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.

मुलांक 4 : संमिश्र काळ राहील. प्रत्येक कामात परिश्रम घ्यावे लागतील. विरोधकांचा अंदाज घ्यावा लागेल. व्यापार-व्यवसायातील व्यवहार बिघडणार नाही, याची काळजी घ्या.

मुलांक 5 : मानसिक तणाव जाणवेल. अनुभवाचा चांगला उपयोग करून घेता येईल. आत्या- मामाला भेटवस्तू देऊन तर पह ा..!

मुलांक 6 : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. दागदागिन्यांची हौसही पुरी करू शकाल. नोकरी-धंदा व अन्य व्यवहारातून भरपूर धन मिळेल. मन प्रसन्न राहील.

मुलांक 7 : प्रवास योग संभवतो. कलाकारांना यश मिळेल. सामाजिक कार्य प्रतिष्ठा मिळवून देईल. आर्थिक योग उत्तम राहील.

मुलांक 8 : प्रत्येकाशी संयमाने वागा. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. धार्मिक भावना वाढेल.

मुलांक 9 : महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. नव्या योजना कार्यान्वित करण्‍यास चांगला काळ. मित्रमंडळ व कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
टिप : प्रतिकूलता असल्यास गाय व गुरुची सेवा, अन्नदान, देवळात जाणे, अध्ययन सामग्री दान करणे व केळीची पूजा केल्याने यश मिळेल.

Mohini Ekadashi 2024 : अनेक वर्षांनंतर मोहिनी एकादशीला अतिशय दुर्मिळ भद्रावास योग

मोहिनी एकादशी 2024 रोजी हे उपाय केल्याने 3 राशींचे भाग्य बदलू शकते

रविवारी करा आरती सूर्याची

Buddha Purnima 2024 बुद्धपौर्णिमेला 3 शुभ योग, 5 पैकी कोणतेही एक काम करा चमत्कार घडेल !

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

Show comments