साडेसातीच्या शेवटच्या अडीचकाची सुरुवात झाली आहे. या दरम्यान गुरूचे भ्रमण तुम्हाला संमिश्र आहे. मंगळही बराच काळ अनुकूल असणार आहे. थोडक्यात, करिअर आणि घर या दोन्ही आघाडय़ांवर तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय या वर्षांत घ्यावे लागतील. थोडक्यात येत्या वर्षांत तुम्हाला समाधान देणाऱ्या काही गोष्टी घडल्यामुळे तुमची तक्रार नसेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : संयुक्त कुटुंबात असलेल्या तुळेच्या व्यक्तिंना कुटुंबातील सदस्यांच्या दरम्यान एकोपा नसल्याचा अनुभव येण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, लहान कुटुंबातील तुळेच्या व्यक्तिंना सुखद कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळेल. तुमच्या जोडीदारावरील विश्वास तुम्ही कायम ठेवण्याची गरज आहे. काही जणांसाठी 2016 या वर्षात कौटुंबिक जीवन समाप्त होण्याची शक्यता आहे. तुम्ही आणि तुमची मुलं यांच्या दरम्यानचं नातं पाहता, तुमच्या मुलांकडून काही समस्या उद्भवणं शक्य आहे. येत्या वर्षांत ‘अति तेथे माती’ एवढेच फक्त लक्षात ठेवा. नवीन व्यावसायिक जागा किंवा भविष्यातील तरतूद करण्यासाठी तुम्ही जिवाचे रान कराल, पण त्यासाठी स्वत:चे स्वास्थ्य बिघडू देऊ नका.
प्रेम आणि प्रणयात तुमचा वेळ वाया न घालवणं उत्तम राहील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यामध्ये समजूतदारपणा दाखवा आणखी काही नको. शारीरिक सुखाचा आनंद घेण्यासाठी, तुमचं आरोग्य पणाला लावू नका.
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडे तणावाचे पण आनंदाचे जाईल. दिवाळीपासून जानेवारीपर्यंत काही कारणाने तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलेल. पूर्वी ठरलेले शुभकार्य पार पडेल. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान घरामध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे तुमची दैनंदिनी धावपळीची असेल. एप्रिल ते जुल यादरम्यान वडिलोपार्जति प्रॉपर्टी किंवा राहती जागा विकून नवीन घर घ्यावेसे वाटेल. जुलै ते सप्टेंबरदरम्यान घरात महत्त्वाचे निर्णय झाल्यामुळे तुमचे भावनाविश्व बदलेल. सप्टेंबरनंतर लांबच्या प्रवासाचे योग संभवतात.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : नोकरीतील लोकांचं आयुष्य उत्तम दिसून येत आहे; परंतु व्यवसायिकांना आपल्या व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. आपल्या भविष्यावर बारकाईनं नजर टाकली तर ११ ऑगस्टनंतर घडामोडी आणखी टोकाला जाण्याची शक्यता आहे.
अनपेक्षित खर्च उपटू शकतात. हे खर्च खूप मोठे असू शकतात, आधीपासूनच काळजी घ्या पैसे देताना किंवा घेताना दक्ष राहा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
व्यापारी वर्गाला दिवाळी ते जानेवारी या कालावधीत मनाप्रमाणे काम झाल्यामुळे चार पसे हातात खुळखुळतील. महत्त्वाच्या कामाकरिता लांबचा प्रवास होईल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत काही मोठे सौदे होऊन आíथक दर्जा उंचावेल. एप्रिलपासून जुलपर्यंत कामाचा विस्तार करण्याकरिता नवीन गुंतवणूक करावी लागेल. जुलनंतर सप्टेंबपर्यंत तुमच्या मनातील एखादी स्वप्नमयी कल्पना अस्तित्वात येईल.
नोकरदार व्यक्तींना बऱ्याच दिवसांनंतर एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे भरपूर काम करावेसे वाटेल. दिवाळी ते जानेवारी या कालावधीमध्ये अवघड कामगिरी पूर्ण केल्याने वरिष्ठ खूश होतील. त्यांना एखादी विशेष सवलत मिळेल. जानेवारीपासून एप्रिलपर्यंत मोठय़ा प्रोजेक्टकरिता त्यांची निवड होईल. परदेशगमनाची संधीही मिळेल.
तरुण मंडळींना येत्या वर्षांत भरपूर काम करून भरपूर पसे कमविण्याचा योग आहे. त्याचा त्यांनी चांगला फायदा उठवावा. स्वत:ची जागा आणि विवाह होणे या दोन्हींकरिता वर्ष अनुकूल आहे. कलाकार आणि खेळाडू त्यांचे कौशल्य प्रदíशत करून एखाद्या पुरस्काराचे मानकरी होतील. चांगले काम झाल्यामुळे त्यांना प्रगतीचा नवीन उच्चांक गाठता येईल.