Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च 2016तील तुमचे भविष्यफल

Webdunia
सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (13:21 IST)
मेष : या महिन्यात तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नही व शत्रुत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी लागेल. परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना जुलै ते सप्टेंबरमध्ये चालना मिळेल. छोटी भांडणे आणि वाद टाळा. प्रेमाचा अदभूत प्रवास अनुभवा. कामाच्याताणामुळे संपूर्ण महिना थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशीव्यवसायातून फायदा होईल.
 
वृषभ : या महिन्यात आर्थिक बाबतीत फार अपेक्षा न बाळगणे बरे. कुटुंब, प्रेम आणि व्यवसायविषयी मार्चचा महिना समाधान देणारे असणार आहे. पण तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल. तुम्ही सर्वांप्रती दयाळू असणार आहात आणि तुमचा हाच स्वभाव आयुष्यात पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल. 
 
मिथुन : ज्या व्यक्तींवर तुमचा संपूर्ण विश्वास आहे, त्याच व्यक्तींना वेळ द्या. मार्चमध्ये अनपेक्षित कारणांमुळे नवीन खर्च उभे राहतील. गुरु़ मंगळ अनुकूल राहिल्याने भरपूर कामे करून आर्थिक तणाव कमी करी शकाल. नोकरीत कामाचा दबाव वाढेल. त्यामुळे थोडी अस्वस्थता व अशांतता लाभेल, मात्र या महिन्यात हे प्रमाण हळूहळू कमी होईल. या काळात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कर्तव्यात कसूर होणार नाही याची काळजी घ्या. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा.
 
कर्क : जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत मार्च महिना अनुकूल राहील. मात्र नको त्या ठिकाणी मानविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. या महिन्यात स्वत:हून बदल न करणे हितावह राहील. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. आणि मुख्य म्हणजे अगदीतुम्ही स्वत:ला दोष द्याल. उदार असणे चांगले आहे, पण तुम्ही परिस्थितीची गडद बाजू बघणे योग्य ठरेल. विद्यार्थ्यांनी अपेक्षित कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी तडजोडीची तयारी ठेवावी.
 
सिंह : या महिन्यात कामानिमित्ताने कदाचित परदेशवारीही होईल. खेळत्या भांडवलाची तरदूत करावी लागेल. नोकरीत येणारा काळ अनुकूल आहे. तुमच्या गुणांची कदर होईल. खास प्रशिक्षणासाठी तुमची निवड होईल. बेकार व्यक्तींना मार्चमध्ये  काम मिळेल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमवता येईल. हा महिना तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.
 
कन्या : तुम्हाला या महिन्यात व्यवसाया निमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. सर्व महत्त्वाचे ग्रह गुरु, शनी व शुक्र अनुकूल आहेत. त्यामुळे तुमची महत्त्वाकांक्षा दिवसेंदिवस वाढत जाईल. आर्थिक ऊब चांगली मिळेल. त्यामुळे हा महिना तुम्हाला संस्मरणीय ठरेल. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुम्ही या महिन्यात कुटुंब, प्रेम आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी वेळ काढाल असे दिसते.
 
तूळ : आरोग्याकडे दुर्लक्ष करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही. तुमच्या करिअरविषयी काही नवीन सुरू करण्याआधी प्रत्येक मुद्दा नीट तपासणे आणि अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घेणे हितावह ठरेल. असमाधानामुळे जुन्या व्यवसायातील भागीदारी तुटण्याची शक्यता आहे. तुमचा पैसा हात राखून खर्च करा, अन्यथा त्यामुळे समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडथळे पार करून उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेता येईल.
 
वृश्चिक : ह्या महिन्यात तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल. परंतु तुम्ही मात्र यामहिन्यात तंदुरुस्त राहणार आहात. निराशेचे काही क्षण येतील, पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफतला मिळेल. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. हा महिना करिअर, पैसा आणि शिक्षणाच्या दृष्टीने फार अनुकूल असणार आहे.
 
धनू : प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. करिअरच्या दृष्टीने हा महिना खूप चांगले नाही. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता.राशीच्या लाभात शनी आणि वर्षभर अनुकूल राहणारा मंगल तुमच्या इच्छा आकांक्षा वाढवणारे आहेत. असे असून मार्च 2016 पर्यंत राश्याधिपती गुरु षष्ठात भ्रमण करणार असल्यामुळे तुमच्या बोलण्या-वागण्यात एक प्रकारची निराशा येईल.
 
मकर : तुमच्या मिळकतीचे स्त्रोत वाढतील, याचं अर्थ हा महिना आर्थिक फळीवर सकारात्मक आहे. राश्याधिपती शनीचे वास्तव्य दशमात असल्याने तुमचे कर्तृत्व दाखवण्याची उत्तम संधी चालून येईल. हाती घ्याल ते तडीस न्याल. विद्यार्थी वर्ग अभ्यासाबाबत अधिक गंभीर होईल आणि कुसंगतीपेक्षा उपयुक्त गोष्टीमध्ये स्वत:चा वेळ गुंतवेल. विवाहोत्सुकांना मार्च 2016 पर्यंतचा काळ विवाह ठरण्याच्या व होण्याच्या दृष्टीने चांगला आहे. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळवून देण्यास अनुकूल वातावरण राहील. उत्तरार्धात घरचे वातावरण फारसे सुसह्य राहणार नाही.
 
कुंभ : या महिन्यात अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या बदलांना तुम्हाला समोरे जावे लागेल. तुमचे प्रेम आणि जिवलग तुम्हाला प्रेम देतील. तुमच्या कार्यालातील लोक आदर देतील, त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यात तुम्हाला खुले विचार मदत करतील. मोसमी आजारामुळे तब्येत बिघडेल. पण त्याहून अधिक काही होणार नाही.
 
मीन : पैशाच्या पाठीमागे धावनू हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम कराल. पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही. तुमच्या आरोग्याची तपासणी करावी. अन्यथा काही गंभीर स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने त्वचा आणि रक्तसंबंधी. तुमच्या प्रेमसंबंधांना गृहीत धरू नका. तुमच्या प्रेमसंबंधी निर्णयांवर ठाम राहण्याची आवश्यकता आहे.
सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Show comments