Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मूलकांनुसार 2016तील भविष्यफल

Webdunia
बुधवार, 30 डिसेंबर 2015 (15:31 IST)
मूलांक 1 असलेल्या लोकांसाठी वर्ष 2016 यशस्वी ठरेल. यावर्षी यश मिळवण्यासाठी मुख्य स्रोत आहे स्वत:वर नियंत्रण ठेवणे आणि शक्यतो स्वत:चे नेतृत्व कौशल्य वाढवणे. यावर्षी शक्यतो वादांपासून लांब राहा, पण एकटे राहू नका. अंक 1 अत्यंत सरळ अंक असल्यामुळे एका गुंता नसलेल्या व्यक्तीप्रमाणे वागावे. परिवर्तनासाठी हे वर्ष फायदेशीर ठरू शकतं. यावर्षी नोकरी, घर किंवा आपला फोन नंबर व इतर काही बदलण्याचा निर्णय योग्य ठरेल.
 
यावर्षी आपले स्वप्न पूर्ण होतील. आपण उत्साहात राहाल आणि यामुळे आपल्या विपरित परिस्थितीला सामोरा जायला मदत मिळेल. यावर्षी इंद्रधनुष्याचे सप्तरंग आपल्यासाठी फायदेशीर ठरतील.
मूलांक 2 असलेल्या लोकांनी वर्ष 2016 मध्ये जरा सावध राहण्याची गरज आहे. यावर्षी घटना आपल्या मनाप्रमाणे घडतं नसल्या तरी न घाबरता स्वत:ला दृढ करायला हवं. शक्य आहे की संकटात आपण एकटे आहे असे जाणवेल पण वेळ पडल्यावर योग्य व्यक्ती आपल्या मदतीसाठी धावून येतील.
 
यावर्षी कोणाशी वैर धरू नका आणि शक्यतो नवीन मित्र बनवा. नवीन मित्र आणि पार्टनर आपल्यासाठी फायदेशीर ठरतील. जोडीदार  किंवा प्रियकर यांच्याशी मतभेद किंवा गैरसमज होऊ देऊ नका. यावर्षी भांडण, तक्रार, वाद विवाद त्रासदायक ठरेल.
 
नवीन मित्र बनवा. यावर्षी नाते संबंधांबाबत सावध राहणे गरजेचं आहे. यावर्षी चंद्रमाशी संबंधित जसे चांदी, तांदूळ व इतर वस्तूंचा वापर करणे फायदेशीर ठरेल.
मूलांक 3 असलेल्या लोकांसाठी 2016 हे वर्ष मिश्रित फल देणारं ठरेल. यावर्षी आपल्या इच्छा वाढतील आणि या इच्छा कधी चांगले तर कधी वाईट परिणाम देतील. तसेच आपल्या स्वप्न आणि इच्छांमुळे आपल्याला निरंतर काम करण्याची प्रेरणा मिळत राहील.
 
मूलांक 3 जातकांनी यावर्षी अती खर्च करणे टाळावे. पैसा न वाचविण्याची प्रवृत्ती घातक ठरू शकते. यावर्षी आपल्या व्यवहारानुसार तुम्हाला त्याचे परिणाम मिळतील म्हणून शक्यतो आपले वर्तन आणि काम प्रामाणिकपणे आयोजित करावे. 
 
यावर्षी तीर्थ यात्रेवर जाण्याचे योग आहेत. मनात आल्यावर फिरायला जाऊन नवीन मित्र बनावा. यामुळे आपल्या कठिण परिस्थितीतही ताण येणार नाही. यावर्षी उन्नती आणि परिवर्तन हे दोन्ही आपल्याला प्रभावित करतील. जीवनाच्या अनेक क्षेत्रात आपली प्रगती होईल. बदली होण्याची शक्यता आहे. नवीन प्रॉपर्टी घेण्याचेही योग आहेत. शक्यतो यावर्षी काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा कारण हीच गोष्ट आपल्या भविष्यात फायदेशीर ठरेल. या व्यतिरिक्त सर्जनशील कामे फायदेशीर ठरू शकतात.
 
मूलांक 4 असलेल्या लोकांसाठी 2016 हे वर्ष आत्मपरीक्षणाचे वर्ष आहे. हे वर्ष भविष्याच्या नियोजनासाठी योग्य ठरेल. यावर्षी कोणतेही कार्य खात्रीपूर्वक करावे.
 
यावर्षी विचार न करता काम करण्याची सवय लावू नका. शक्यतो आपल्या कार्याचे नियोजन करूनच पार पाडावे. यावर्षी असं कोणतेही कार्य करू नका ज्याने आपल्या प्रतिष्ठेला नुकसान होईल. यावर्षी कोणत्याही प्रकाराचा अभिमान बाळगू नका.
 
अंकज्योतिषाप्रमाणे यावर्षी आपण पूर्णपणे पद्धतशीर काम करायला पाहिजे. आपल्या मूलकांप्रमाणे योजनाबद्ध कार्य केल्याने आपल्याला यश मिळेल. आपली योग्यता वाढवण्याचा प्रयत्न करा, ज्याचे पुढे जाऊन नक्कीच फायदा मिळेल. शारीरिक आरोग्यासोबत मेंदूच्या व्यायामाकडेही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. यावर्षी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. यावर्षी यश मिळविण्यासाठी मागील वर्षांच्या तुलनेत अधिक मेहनत करावी लागणार आहे. मनाप्रमाणे फळ मिळाले नाही तर घाबरायची गरज नाही. काम करण्याचा इतर मार्गांवरही विचार केला जाऊ शकतो. शनी आणि चंद्रमामुळे 4 मूलांक असलेल्या लोकांना यावर्षी संघर्ष करावा लागू शकतो.
 
मुलांक 5 असलेल्या लोकांसाठी 2016 बदल घेऊन येईल. यावर्षी आपल्या काही बदल करावे लागले तर अवश्य करा कारण ही वेळ योग्य आहे. आणि जर आपल्याला सर्वकाही बदललेलं वाटतं असलं तरी काळजी करण्याची बाब नाही हा सर्व अंकाचा खेळ आहे.
 
कोणत्याही परिस्थितीबद्दल खात्री पटल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका नाहीतर विपरित परिणाम होऊ शकतात. परिस्थितींच्या आहारी जाऊ नका आणि कोणावरही आपली मते लादू नका. बिनधास्त राहा.
 
यावर्षी आपल्या जीवनाबद्दल गंभीरपणे विचार करा आणि बदल करण्याची गरज भासल्यास बदल घडवून आणा. यावर्षी आपण आपली क्षमता आणि कौशल्य परिष्कृत करण्याचा प्रयत्न करू शकता. याचे सुखद परिणाम मिळतील. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे यावर्षी आपण दुसर्‍यांसमोर स्वत:ची विशेष छाप सोडण्यात यशस्वी ठराल.
मूलांक 6 असलेल्या लोकांसाठी ही वेळ आपला सामाजिक वर्चस्व वाढण्यासाठी योग्य आहे. यावर्षी केलेली मित्रता भविष्यात चांगले परिणाम देईल. मित्रांसोबत हे वर्ष काही नवीन शिकण्यासाठी योग्य आहे.
 
यावर्षी अती सतर्क राहण्याची गरज नाही. केवळ नवीन मित्रांमुळे जुन्या मित्रांकडे दुर्लक्ष करू नका. अहंकारापासून स्वत:ला दूर ठेवा ज्याने इतर लोकं आपल्या मदतीसाठी पुढे येतील. अहंकारामुळे आपण स्वत:च नुकसान करून बसाल. 
 
ह्या वर्षी सोशल होण्याची गरज आहे. शक्यतो दुसर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर राहा. नवीनं मित्र बनवा पण संगत योग्य असावी हे लक्षात ठेवा. दुसर्‍याची मदत कराल तर वेळप्रसंगी ते आपल्यासाठी धाव घेतील हे विसरू नका. कुटुंबाला जास्त वेळ द्या. शक्य असल्यास कुटुंबासोबत पर्यटनाला जाण्याची योजना आखा. 
मूलांक 7 असलेल्या लोकांसाठी 2016 आत्मचिंतनासाठी महत्त्वाचे वर्ष आहे. यावर्षी आपले दोष ओळखण्याचा प्रयत्न करा. यावर्षी कोणतेही कार्य करण्याआधी लक्ष्य निर्धारित करा आणि मगच कामाला सुरुवात करा.
 
स्वत:ला व्यस्त ठेवा अन्यथा रिकाम्या डोक्यात अनेक विपरित विचार येत असतात. 
 
आपण येणार्‍या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी योग्य ती योजना आखून मग त्यावर काम करा. यावर्षी धार्मिक कार्यांमध्ये ही मन रमेल.
मूलांक 8 असलेल्या लोकांसाठी वर्ष 2016 आत्मचिंतन करण्यासाठी योग्य वर्ष आहे. यावर्षी स्वत:मध्ये होणारे बदल भविष्यात दिसून येतील. व्यापार्‍यांसाठी वेळ अनुकूल आहे, त्यांना यश अवश्य लाभेल.
 
यावर्षी केवळ आपल्या मनाचे ऐकावे, दुसर्‍याच्या म्हणण्याप्रमाणे कार्य केल्यावर आपले नुकसान होऊ शकतं. कोणतेही कार्य निष्काळजीपणे करण्याने तुमचे नुकसान होऊ शकत. यावर्षी प्रत्येक कार्य मन लावून आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा.  
 
यावर्षी स्वत:ला एका लीडरप्रमाणे प्रस्तुत करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. नवीन गोष्टीं शिकण्याची संधी सोडू नका यामुळे तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा मिळेल. यावर्षी आपण स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न कराल. शक्यतो स्वत:शी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करावा.
मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी वर्ष 2016 भूतकाळ बदलून नवीन भविष्य घडवण्यासाठी आहे. यावर्षी आपल्याला भरभरून यश मिळण्याची शक्यता आहे. सर्व ग्रह आपल्याकडून आहे. नवीन मित्र बनू शकतात.
 
यावर्षी स्वत:चा राग आवरा, अन्यथा वाद निर्माण होई. कोणत्याही प्रकरणात हस्तक्षेप करायला जाऊ नका. हे आपल्यासाठी समस्या उत्पन्न करणारे ठरेल.
 
यावर्षी ते सर्व कार्य करा ज्याने आपल्याला प्रसन्नता मिळते. मनाला पटत नसलेलं कोणतंही काम करू नका. यावर्षी रागावर नियंत्रण ठेवण्याची फार गरज आहे. मागील काही वर्ष चांगले नसले गेले तरी हे वर्ष भरपूर सुख देणारं ठरेल. भाग्य आपल्या दाराशी उभे आहे. फक्त दार उघडा आणि आनंद लुटून घ्या.
 
सर्व पहा

नवीन

Skanda Sashti 2025: स्कंद षष्ठीच्या दिवशी भगवान कार्तिकेयाला काय अर्पण करावे?

आरती शनिवारची

मकर संक्रांती 2025 तारीख, मुहूर्त आणि धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व

Shanivar Upay शनिवारचे उपाय

Naga Sadhu Lifestyle नागा साधूंचे वेगळे जग, स्वत:चं करतात पिंडदान

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

Show comments