मे ष तुम्ही नियोजन केलेल्या कामात अनपेक्षित बदल करावे लागतील. त्यामुळे तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल करावा लागेल. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. व्यापारात योग्य व्यक्तींची योग्य कामासाठी निवड करा. आर्थिक व्यवहारांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा. नोकरीमध्ये कामाच्या रचनेत फेरफार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा ताण वाढेल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल.