Festival Posters

कर्क राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
वर्ष 2017मध्ये तृतीयेत आलेला गुरु संपूर्ण वर्ष तेथेच आहे. शनी मात्र फेब्रुवारीनंतर षष्ठमस्थानात प्रवेश करेल. त्यामुळे ग्रहमान संमिश्र आहे असेच म्हणावे लागेल. मन आणि शरीर या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही जर प्रकृतीची काळजी घेतलीत तर अनेक गोष्टी तुम्हाला मनाप्रमाणे करता येतील. एकंदरीत प्रगतिकारक ग्रहमान आहे. त्याचा फायदा उठवा. त्यामुळे काळजीची बाब नाही. एकूण या वर्षी तुमच्यातील विनय, नम्रता, यशाचा आलेख उंचावतील, पण कामात गाफीलता, बेपर्वाई ये गोष्टी कटाक्षाने टाळा. महिलावर्गाचे प्रयत्नातून प्रश्न सुटतील. नवीन परिचय होतील. 
पुढे धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... या वर्षी मे-जून 2017 पर्यंतचा काळा थोडासा खडतर राहील. पैसे मिळतील, पण त्याला वाटा आधीच फुटल्या असल्याने हातात काहीच शिल्लक राहणार नाही. पूर्वीची कर्जे फेडावी लागतील. व्यापार-उद्योगात आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे तुम्हाला भरपूर काम करावेसे वाटेल. जानेवारीपासून जूनपर्यंत आता चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काहीतरी नवीन कराल. कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान विकत घ्यावेसे वाटेल. फेब्रुवारीनंतर व्यापारातील स्पर्धा जास्त तीव्र होणार आहे हे लक्षात ठेवा. त्या दृष्टीने आवश्यक ते उपाय योजा. पैशाची आवक समाधानकारक असल्यामुळे तुम्हाला चिंता राहणार नाही. जुलै ते सप्टेंबर 2017 या दरम्यान धंद्याच्या वाढीकरता परदेशात फेरफटका होईल. नोकरीत बदल करू इच्छिणार्‍यांना जुलै-ऑगस्ट 2017 हा काळ चांगला आहे. कामानिमित्ताने देशात किंवा परदेशात प्रवास होईल. काही जणांना जानेवारी ते मे या कालावधीत परदेशी जाता येईल.
गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... गृहसौख्याच्या दृष्टीने हे वर्ष थोडे जोखमीचे आहे. आपले कार्यक्षेत्र आणि नैतिक जबाबदार्‍या यांचा समन्वय साधणे अत्यावश्यक होईल. गृहसौख्याच्या बाबतीत तुमची रास अतिशय संवेदनशील आहे. सर्वांना मदत करायची तुमची इच्छा असेल, पण कामाच्या व्यापामुळे तुम्ही ती पूर्ण करू शकणार नाही. सप्टेंबरनंतर काही प्रमाणात यावर तोडगा निघेल. नवीन वास्तूचे स्वप्न पुढील दिवाळीपर्यंत पूर्ण होईल. प्रकृतीचे जुने आजार असतील तर मात्र वर्षभर काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. तरुणांना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल. त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. महिलांना घरामध्ये आणि सामूहिक कामात बरीच मागणी राहील. खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळाल्याने येत्या वर्षात त्यांचा उत्साह द्विगुणित होईल. एकंदरीत नवीन वर्षात सर्वांना संमिश्र फळे देणारे ग्रहमान राहील. 
सर्व पहा

नवीन

श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa

शनिवारची आरती

शनिवारी मारुती स्तोत्र वाचण्याचे फायदे, कधी आणि किती वेळा पठण करावे?

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

पुढील लेख
Show comments