Dharma Sangrah

कुंभ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
कुंभ सप्टेंबरनंतर गुरू अष्टमस्थानात आला. त्याने ठरविलेले उद्दिष्ट बदलायला भाग पाडले. येत्या वर्षांत करियर उत्तम असेल, पण व्यक्तिगत जीवनात तुम्हाला तडजोड करावी लागेल. येत्या वर्षात सहज यशाची अपेक्षा न ठेवणे चांगले. मंगळ मात्र तुम्हाला स्फूर्ती देणारा ठरेल. मनावरती थोडेसे नियंत्रण ठेवलेत आणि निश्चयाने प्रयत्न करीत राहिलात तर कठीण परिस्थितीतूनही तुम्ही वाट काढू शकाल. स्वत:चे आत्मपरीक्षण करा. जानेवारी ते जून 2017 या दरम्यान परिस्थिती आशावादी होईल. त्यामुळे नवीन कल्पना मनामध्ये तरळतील. त्याची कार्यवाही जुलैनंतर होऊन जीवन अधिक गतिमान बनेल. 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... नोकरदार व्यक्तींना गेल्या एक दोन वर्षात लाभलेले सुख आणि सौख्य लाभणार नाही. त्यांना थोडीशी गैरसोय सहन करावी लागेल. तसेच मेहनतही वाढेल. त्याचा आळस न करता कष्ट करण्याची तयारी ठेवलीत तर फायदा ऑगस्ट-सप्टेंबरनंतर मिळेल. नोकरीत बदल, कामाच्या निमित्ताने परदेशवारी, वाढती यांसारख्या गोष्टींचा आनंद सप्टेंबरनंतर मिळेल. व्यापारउद्योगात तुमचे इरादे बुलंद असतील. भरपूर काम करून भरपूर पैसे मिळविण्याचा तुमचा इरादा असेल, पण स्पर्धकांचा अंदाज घेतल्याशिवाय कोणतेही उद्दिष्ट ठरवू नका. अष्टमस्थानात असलेला गुरू तुमचे काम कमी करायला भाग पाडेल. त्याला सभोवतालची परिस्थिती जबाबदार असेल. डिसेंबर ते एप्रिल या दरम्यान एखादे मोठे प्रोजेक्ट पूर्ण होईल. जुलै ते सप्टेंबर या दरम्यान पैशांची गुंतवणूक जपून करा. एकंदरीत ग्रहमान संमिश्र आहे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची तयारी ठेवा. येत्या वर्षांत चांगले काम केल्याबद्दल पगारवाढ होईल; पण शक्यतो बढती स्वीकारू नका, कारण तुम्ही त्याला न्याय देऊ शकणार नाही.
गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... कौटुंबिक जीवनात येत्या वर्षात थोडे ताणतणाव असतील. स्वत:ची किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची प्रकृतीकडे लक्ष ठेवा. नातेवाईक, आप्तेष्ट यांची असूया जाणवेल. आर्थिक नियोजन करण्यावर तुमचा भर असतोच, त्याचा उपयोग होईल. अनेक बेत ठरवाल. त्यातील यश कुटुंबातील इतर व्यक्तींचे सहकार्य कसे मिळते यावर अवलंबून असेल. नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करावेसे वाटेल. घरामधल्या एखाद्या सदस्याच्या प्रश्नामुळे तुमचे विचारचक्र बदलेल. एप्रिल किंवा ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास स्थलांतर होण्याची 
शक्यता आहे. परदेशवारी होईल. तरुणांचे विवाह जमतील. मुलांच्या स्थिरतेचा प्रश्न सुटेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात दुर्लक्ष करून चालणार नाही. अतिआत्मविश्वास न बाळगता अभ्यास वेळेत पूर्ण करावा. तरुणांना वर्ष चांगले आहे. मात्र फार मोठे धोके घेऊ नये. महिलांना घरामध्ये प्रत्येक गोष्टीत गृहीत धरले जाईल. त्याचा त्यांना कंटाळा येईल. राशीच्या जातकांच्या दबून राहिलेल्या अनके इच्छा आकांक्षांना योग्य संधी मिळाल्याने तुमच्यातील जोम-उत्साह आणि महत्त्वाकांक्षा जागृत होईल, त्या जोरावर बरेच काही करू शकाल. कलाकार खेळाडू यांना त्यांच्या क्षेत्रातील अंतर्गत राजकारणाचा त्रास जाणवेल. 
सर्व पहा

नवीन

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

शनिवारची आरती

भक्तीत अहंकार कसा प्रवेश करतो, अहंभाव पासून वाचण्याचे सोपे उपाय

शुक्रवारी या स्त्रोताचे पाठ केल्याने दारिद्र्य नाहीसे होते

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

पुढील लेख
Show comments