Marathi Biodata Maker

लाल किताब प्रमाणे वर्ष 2017तील भविष्यफल

Webdunia
लाल किताब तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रातील समस्यांचे समाधान करते. यात शनीची साडेसातीतील नकारात्मक आणि सकारात्मक प्रभावांबद्दल सांगण्यात येत आहे. त्याशिवाय यात तुमच्या इतर समस्यांचे समाधान मिळणार आहे. निश्चितच हे वाचून तुम्ही नवीन वर्ष 2017ला अजून शानदार बनवण्यात यशस्वी व्हाल.

मेष :  हे वर्ष तुमच्यासाठी सुखकारक ठरणार आहे. परोपकाराच्या कामांमध्ये तुम्ही भाग घ्याल. विद्यार्थ्यांना पठण-पाठनमध्ये यश मिळेल. व्यवसायात यश मिळेल. जोडीदारासोबत तुमचे सामंजस्य उत्तम राहणार आहे. पण तुम्हाला दोघांना तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेम प्रसंगांसाठी ही वेळ चांगली आहे. प्रियकर/प्रेयसीशी भेट होण्याची योग आहे.  
 
उपाय : जेवण झाल्यानंतर सौंफ-साखर किंवा साखरेचा प्रयोग करणे उत्तम.  
वृषभ : या वर्षी तुम्ही तुमच्या बळावर प्रगती कराल आणि दुसर्‍यांच्या प्रगतीत देखील सहायक ठराल. आर्थिक स्थिती चांगली राहील.  मोठ्या अधिकार्‍यांशी तुमचे संबंध चांगले राहतिल ज्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन मिळेल. या दरम्यान तुमच्या व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन उत्तम जाईल. प्रेमासाठी हा वेळ चांगला आहे. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.  
 
उपाय: इत्र किंवा सेंट तुमच्या कपड्यांवर लावणे शुभ ठरेल.  
 
मिथुन
Mithun lalKitab rashifal 2017 या वर्षी नोकरीमध्ये मेहनतीच्या बळावर प्रगती कराल. बिझनसमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. शिक्षा प्राप्त करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम आहे आणि ते परदेशात देखील जाऊ शकतात. वैवाहिक सुख उत्तम मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या मदतीमुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकते. या वर्षी प्रेम मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. या दरम्यान चांगल्या आरोग्याचा फायदा घ्या.  
 
उपाय: बागवानी हे तुमच्यासाठी उत्तम राहणार आहे.  
कर्क
Kark lalKitab rashifal 2017 हे  वर्ष तुमच्यासाठी आर्थिकबाबींमध्ये संपन्नता घेऊन येणार आहे. तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होणार आहे.  नोकरी व बिझनेसमध्ये तुमचे भाग्य उजळेल. पारिवारिक सुख उत्तम मिळणार आहे आणि घरात पाहुण्यांची भरमार राहणार आहे. विद्यार्थ्यांना भरपूर यश मिळणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन उत्तम राहणार आहे.  या दरम्यान तुमच्या लव्ह लाईफमध्ये गैरसमज आणि  नीरसता वाढू शकते. तुमचे आरोग्य उत्तम राहील.  
 
उपाय: तांदूळ किंवा दुधाचे दान करणे तुमच्यासाठी हितकर असेल.   
 
सिंह
Singh lalKitab rashifal 2017 या वर्षी तुम्ही आपल्या बुद्धीच्या बळावर धन कमावण्यात यशस्वी ठराल. नोकरी आणि व्यापारामध्ये यश मिळेल. काही लोकांची नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी विद्येच्या क्षेत्रात जबरदस्त उन्नती करतील. संतानकडून सुख मिळेल.  दांपत्य जीवनाचा खराखुरा आनंद तुम्ही या काळात घ्याल.  आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. प्रेमाच्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. तुमची प्रकृती निरोगी राहील आणि मानसिक प्रसन्नता देखील वाढेल.  
 
उपाय : कुठल्याही कार्याला जाताना गूळ खाऊन निघणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.  
कन्या
Kanya lalKitab rashifal 2017 नोकरीत तुम्हाला वरिष्ठ अधिकार्‍यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकरीत्या ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. व्यापारीवर्ग कुठलेही गुंतवणूक करण्याअगोदर चांगल्या प्रकारे विचार करून घ्या. वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराच्या भावनेला समजण्याचा प्रयत्न करा व त्यांना पूर्ण सहयोग द्या. प्रेम संबंधांमध्ये प्रियकर/प्रेसयीसाठी वेळ काढा व त्यांना एखादी भेट वस्तू देऊन त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.  
 
उपाय: हिरव्या मुगाची डाळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.  
 
तूळ  
Tula lalKitab rashifal 2017 ही वेळ तुमची नोकरी आणि व्यवसायासाठी फारच उत्तम आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये तुम्ही यश मिळवाल.  विद्यार्थींचा अभ्यासात मन लागेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला तालमेल बसवून चालावे लागणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमचे आरोग्य थोडे जपावे लागणार आहे. प्रेम प्रसंग सामान्य राहतील. रोज व्यायाम आणि योगाभ्यास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  
 
उपाय: तूप, दही व पांढरी बर्फी एखाद्या धार्मिक स्थळावर दान करणे उत्तम.
कन्या
Kanya lalKitab rashifal 2017 नोकरीत तुम्हाला वरिष्ठ अधिकार्‍यांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिकरीत्या ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. व्यापारीवर्ग कुठलेही गुंतवणूक करण्याअगोदर चांगल्या प्रकारे विचार करून घ्या. वैवाहिक जीवनात आपल्या जोडीदाराच्या भावनेला समजण्याचा प्रयत्न करा व त्यांना पूर्ण सहयोग द्या. प्रेम संबंधांमध्ये प्रियकर/प्रेसयीसाठी वेळ काढा व त्यांना एखादी भेट वस्तू देऊन त्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे.  
 
उपाय: हिरव्या मुगाची डाळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे.  

तूळ  
Tula lalKitab rashifal 2017 ही वेळ तुमची नोकरी आणि व्यवसायासाठी फारच उत्तम आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये तुम्ही यश मिळवाल.  विद्यार्थींचा अभ्यासात मन लागेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला तालमेल बसवून चालावे लागणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमचे आरोग्य थोडे जपावे लागणार आहे. प्रेम प्रसंग सामान्य राहतील. रोज व्यायाम आणि योगाभ्यास करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.  
 
उपाय: तूप, दही व पांढरी बर्फी एखाद्या धार्मिक स्थळावर दान करणे उत्तम.  
वृश्चिक
Vrishchik lalKitab rashifal 2017 या वर्षी नोकरी करणार्‍या लोकांना बढतीचे योग आहे. व्यापाराच्या बाबतीत नवीन गुंतवणूक करू नये. वैवाहिक जीवनात समस्या येऊ शकतात. जोडीदारच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुमचे आरोग्य उत्तम राहील व तुम्ही स्वत:ला ऊर्जावान अनुभव कराल. प्रेम प्रसंगांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आपल्या प्रियकरावर शंका करू नका.  
 
उपाय: नियमित मधाचे सेवन करणे तुमच्यासाठी लाभकारी ठरेल.
 
धनू  
Dhanu lalKitab rashifal 2017 नोकरीकरणार्‍या लोकांना या दरम्यान बरीच मेहनत करावी लागणार आहे पण मेहनतीप्रमाणे फायदा कमी होईल. विद्यार्थी वर्ग अभ्यासासाठी विदेश गमन करू शकतात. कौटुंबिक जीवनात प्रेम वाढेल आणि तुम्ही जोडीदारासोबत एखाद्या  धार्मिक यात्रेवर जाऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या, फूड पॉयजिनिंग होण्याची शक्यता आहे. या वर्षी प्रेमात वाढ होईल. आपल्या  पार्टनरकडून तुम्हाला एखादी किमती भेट वस्तू मिळू शकते.  
 
उपाय: हळदीचे टिळक मस्तकावर लावणे तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरेल.
मकर
Makar lalKitab rashifal 2017 या वर्षी नोकरीमध्ये तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. पण शेवटचा परिणाम तुमच्या हक्कात येईल. व्यावसायिकांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात अडचण येण्याची शक्यता आहे. पारिवारिक जीवनात तुम्हाला आनंद मिळेल. ऑफिसाकडून तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या यात्रेवर जाऊ शकता. आरोग्य चांगले राहणार असून तुमच्यात  बराच जोष राहणार आहे. प्रेम प्रसंग चांगले राहतील. आपल्या प्रियकरासोबत काही सुखाचे क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.  
 
उपाय: मांसाहाराचा त्याग आणि दारूचे सेवनापासून स्वत:चा बचाव केला पाहिजे.  
 
कुंभ
Kumbh lalKitab rashifal 2017 नोकरी करणार्‍या लोकांसाठी हा काळ उत्तम जाणार आहे. जर तुमचे एखादे प्रमोशन थांबले असेल तर या वेळेस ते होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला बिझनसमध्ये यश मिळेल. उच्च शिक्षा प्राप्त करत असलेले विद्यार्थ्यांना विदेश जाण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात थोडा त्रास संभवतो. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. प्रेम प्रसंगांमध्ये आनंद मिळेल. जर तुम्ही कोणाला प्रपोज करत असाल तर त्याच्याकडून होकार मिळेल.  
 
उपाय: एखाद्या गरीब व्यक्तीची मदत करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.  
 
मीन
Meen lalKitab rashifal 2017 हे वर्ष नोकरी आणि व्यावसायिक क्षेत्रात यश देणारे ठरणार आहे. विद्यार्थीवर्गासाठी ही उत्तम संधी आहे. त्यांना अभ्यासात यश मिळेल. पारिवारिक जीवनात थोडे तणाव निर्माण होतील. आपल्या जोडीदाराच्या भावनांचे आदर केले पाहिजे.  या दरम्यान आरोग्याची काळजी घेणे फारच गरजेचे आहे. प्रेमी जोडप्यांसाठी हा काळ फारच उत्तम ठरेल. एखाद्या जुन्या मैत्रीचे प्रेमात रूपान्तर होण्याची शक्यता आहे.  
उपाय: घरात सूर्यमुखी किंवा झेंडूचे फुल लावून त्यांची देखरेख करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल.  
सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी 'राजवाडी होळी'

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

Holi Special Tourism Maharashtra होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम ठिकाणे

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments