Marathi Biodata Maker

जानेवारी 2017तील भविष्यफल

Webdunia
शनिवार, 31 डिसेंबर 2016 (11:56 IST)
मेष : वर्षातील नवीन महिन्यात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. घरापासून दूर जावे लागणार आहे. या महिन्याच्या पूर्वार्धात कुंभ राशीत मंगळ-शुक्र एकत्र आलेत. आपल्याकडे असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. संसार-उद्योगातील वाद वाढवू नका. भूतकाळातील हेवेदावे, शत्रुत्व सूडाची भावना विसरून जा. क्षमाशीलता हा मोठा सद्गुण आहे.  नवीनं कामे, नवीन स्पर्धा तूर्त नको. उत्तरार्धात वरिष्ठांची मर्जी होईल. उधळी प्रवृत्ती बनेल. कायदेशीर बाबी सांभाळा. विसरभोळेपणा जाणवेल. अभ्यासात गाफीलपणा नको. महिन्याच्या उत्तरार्ध शुभदायक आहे. 
वृषभ : या महिन्यात शारीरिक व्याधी जाणवेल. दशमात मंगळ, शुक्र एकंदरीत ग्रहांचा  वृषभ राशीत उत्तम मेळ बसत आहे. जी कामे हाती घ्याल ती पूर्णपणे यशस्वी कराल.  आरोग्याविषयीच्या तक्रारी दूर होतील. थोरामोठ्याच्या भेटीगाठी  होतील.  उत्तरार्धात आर्थिक कोंडी सुटेल. सर्व प्रकारचे लाभ होतील मित्रांच्यामुळे अडचणीत याल.विवाह जुळतील प्रवास घडेल. धंद्यात समाधान नसेल. घसा दुखेल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल.सर्व प्रकारचे लाभ होतील.  
मिथुन : या महिन्यात प्रवास घडेल. शारीरिक दगदग होईल. उत्तरार्धात नोकरीत बदली, धंद्यात अस्थिरता जाणवेल. निर्णायक कामात यश मिळेल. गुणांना वाव मिळेल. नवीन वस्त्रे मिळतील. मंगळ-शुक्राची उत्तम साथ लाभेल. 14 जानेवारीपर्यंत सूर्य अनुकूल राहील. त्यात महत्त्वाचे निर्णय घ्याल. भावविवशता दूर ठेवा. व्यवहार, उद्योग -धंद्यात कटाक्षाने लक्ष घालावे. नवीन जागेचा प्रस्ताव पुढे येईल. जागा बदलण्याचा योग आहे. महिलांना गृहसौख्य उत्तम लाभेल. 
कर्क : या  महिन्यात छंदिष्ट बनाल. पदरदेशमगन घडेल. आरोग्य सांभाळा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. विवाह जुळतील. उत्तरार्धात सरकारी कामासाठी खर्च होईल. प्रशिक्षणासाठी निवड होईल. महिन्याच्या पूर्वार्धात उद्योगधंद्यात , नोकरीत विशेष प्रगती होईल. मात्र अती आत्मविश्वास टाळा. तसेच चर्चेतून प्रश्न सोपे करा. आर्थिक स्थिती चांगली राहील. जुनी येणी येतील.
सिंह : तुमच्या राशीत 27 जानेवारीपर्यंत शुक्राचे उत्तम सहकार्य लाभेल. 14 जानेवारीला रवी षष्ठात असल्याने विरोधी सूर कमी होईल. घरापासून दूर जावे लागेल. अचानक लाभ होतील. विवाह जुळतील. उत्तरार्ध कामात यश मिळेल. अती आत्मविश्वास राहील. शारीरिक व्याधी जाणवतील. वाहन जपून चालवा. नोकरीधंद्यात समजुतीचे वातावरण पोषक ठरेल. आर्थिक लाभ, मानसिक स्थिती चांगली राहील. समस्या दूर होतील. 
कन्या : शनी, रवी, मंगळ, शुक्र यांचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन जबाबदार्‍या घेऊन त्या यशस्वीरीत्या पूर्ण करून दाखवाल. सामाजिक कार्यात महत्त्वाचा सहभाग. त्यातून नवीन परिचय वाढतील. प्रगतीसाठी नवीन संधी उपलब्ध होईल पण घरगृस्थीची चिंता राहील. उत्तरार्ध संततीचे उपद्व्याप जाणवतील. परदेशगमन घडेल. मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे आहे. विवाह जुळतील. शत्रूंचा त्रास होण्याची शक्यता आहे तसेच वैवाहिक जीवनात देखील त्रास होऊ शकतो म्हणून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. 
तूळ : नवीन वर्षातील पूर्वार्ध महत्त्वाच्या कामात जाणार आहे आणि उत्तरार्ध घरगृहस्थीच्या काळजीत जाणार आहे. वडिलांची काळजी घ्या. पराक्रमात रवी आहे. 14 जानेवारीपर्यंत, त्याआधी महत्त्वाची कामे उकरून घ्या. पंचमात शुक्र, मंगळ, घरातील मुलांचे परिचयातून विवाहयोग जुळून येतील. मंगळाच्या षष्ठातल्या आगमनामुळे शत्रुत्व कमी होईल. सामाजिक कार्यात यश मिळेल. उदिष्टपूर्तीसाठी प्रयत्नशील राहाल. सुवर्णालंकाराची खरेदी कराल. स्थावर इस्टेटीत गुंतवणूक कराल. 
वृश्चिक : 14 जानेवारीला रवी मकर राशीत जाणार आहे. त्याआधी तुमची महत्त्वाची कामे उरकून घ्या. जुनी येणी, जमीन, स्थावर व्यवहारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या महिन्यात आर्थिक प्राप्ती जेमतेम होईल. पोटाचे विकार जाणवतील. उत्तरार्धात कामे अधिक गतिमान होतील. घरगृहस्थीबद्दल संवेदनशील राहाल. कला क्रीडाक्षेत्रात चमकाल. कौटुंबिक वादविवाद टाळा, समजुतीने घ्या. 
धनू : या महिन्यात तुम्हाला नवीन कल्पना सुचतील. उत्तरार्धात आर्थिक आवक कमी होण्याची शक्यता आहे पण खर्च जास्त होणार आहे. गुणवत्ता वाढवा. 14 जानेवारीच्या आधी सर्व महत्त्वाचे काम उरकून घ्या. पराक्रमात शुक्र, मंगळ असल्याने उद्योगधंद्यात, नोकरीत यशस्वी व्हाल. नवीन कामे, नवीन योजना हाती येतील. सामाजिक क्षेत्रात नावलौकिक होईल. धावपळ वाढेल. घाईगर्दीने कुठलेही निर्णय घेऊ नका. 
मकर : या महिन्यात खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. एखाद्या विपरीत घटनेत लाभ मिळण्याची शक्यता आहे. विवाह जुळतील. धार्मिक कामांसाठी खर्च होईल. गुरू-शनी-शुक्र शुभावस्थेत आहेत. घरातील वातावरण आनंदी राहील. बौद्धिक, राजकीय क्षेत्रातील मंडळींशी संबंध येईल. उद्योगधंद्यात, नोकरीत आर्थिक लाभ होईल. उत्तरार्धात कामात चैतन्य आणाल. 
कुंभ : महिन्याच्या पूर्वार्धात संधी,योजना पूर्ण होण्याची शक्यता आहे. उद्योगधंद्यात, नोकरीत पैशाची आवक छान राहणार आहे. मित्रमंडळीत वेळ आनंदात जाईल. आरोग्य चांगले राहणार आहे. या महिन्यात आर्थिक प्राप्ती चांगली होणार आहे. उत्तरार्धात खर्च वाढतील. मित्रांना स्वत:मदत करून तुम्ही अडचणीत याल. खर्चावर नियंत्रण ठेवणे फारच गरचेजे आहे. आरोग्याची काळजी घ्या तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्यावे. 
मीन : या महिन्यात लाभात रवी असल्याने मान सन्मानाचे योग राहणार आहे. स्वराशीत मंगळ आहे. वाहने सावकाश चालवा अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. या महिन्यात नोकरीत बढती मिळेल. खरेदी विक्री वाढेल. कायदेशीर बाबी सांभाळा. विवाह जुळतील. उत्तरार्धात आर्थिक प्राप्ती वाढणार आहे. पुरस्कार मिळतील अतिसंताप रागावर नियंत्रण ठेवा. नोरीधंद्यातील जबाबदार्‍यांत वेळेला जास्त महत्त्वा द्या. मौल्यवान वस्तू जपा, आरोग्य उत्तम राहील. 
 संपूर्ण 12 राश्यांचे 2017तील भविष्यफल
सर्व पहा

नवीन

ऐतिहासिक आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारी 'राजवाडी होळी'

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

Holi Special Tourism Maharashtra होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम ठिकाणे

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments