Dharma Sangrah

साप्ताहिक राशीफल 12 ते 18 फेब्रुवारी 2017

Webdunia
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017 (14:28 IST)
मेष :  ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. गणेशजींचा सल्ला आहे की थोडे सावधगिरीने चाला. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुम्हाला शोक संदेश मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ : आठवड्याची सुरुवात तुम्ही बेचैन व्हाल. गणेशजींचासल्ला आहे की तुम्हाला या आठवड्यात आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रार असेल तर लगेचच आरोग्य चाचणी करून त्याचे समाधान करावे. तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्याचे उत्तम योग मिळणार आहे. जर तुम्ही लोकांना रुपये उसने दिले असतील तर त्याची लवकरच परतफेड होण्याची शक्यता आहे.

मिथुन : तुमच्या व्यय स्थानाचा मालक मंगळ आणि कुटुंब स्थानाचा मालक सूर्य दोन्ही धन स्थानात युतीत असून दुसर्‍या घरात आहे. व्यवसायात गुंतवणूक मुळे तुमचा हात तंग राहू शकतो. बँक लोनचाहफ्ता आणि व्याज हे तुमच्या चिंतेचा विषय ठरणार आहे. 13 आणि 14 तारखेच्या दरम्यान तुम्हाला थोडा धीर मिळेल. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता.  

कर्क : कुटुंबीयांशी निगडित बाबींमध्ये सध्या समाधान होण्याची शक्यता फारच कमी आहे. काही प्रकरणांमुळे तुम्हाला न्यायालयीन खटल्यात अडकण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या प्रकृतीमुळे तुम्ही काळजीत असाल. जर तुम्ही अस्वस्थ जाणवाल तर त्वरित डॉक्टरांना भेटा आणि स्वतःची मेडिकल चाचणी करा. डोळ्यांशी संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला त्यांच्या मेहनतीच्या बळावर परिणाम मिळतील. प्रवेश परीक्षांमध्ये देखील यश मिळेल.

सिंह : या आठवड्याची सुरुवात तुम्ही पूर्ण उत्साहाने कराल. तुमच्या लग्न स्थानात मंगळ आणि सूर्याची युती असेल, जेव्हाकी या स्थानाचा मालक बुध व्यय भावात आहे. विचारांमध्ये उग्रता येऊ शकते. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्‍यां सोबत होणारी भेट तुम्हाला येणाऱ्या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे.

कन्या : 13 आणि 14 तारखेदरम्यान शेयर बाजार, मशीन आणि ब्रोकर सारख्या कार्यांमध्ये तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीच्या स्थानात शनी वक्री आहे यामुळे तुमच्या प्रत्येक कार्यांमध्ये विलंब आणि अडचणी येतील. प्रत्येक शनिवारी मारुतीला तेल आणि शेंदूर अर्पित करावा किंवा शनी महाराजाचे दर्शन घ्यावे.

तूळ : आर्थिक फायदेसाठी हा आठवडा आधीपेक्षा उत्तम आहे. पण कमजोर पक्ष असा आहे की तुमच्या धन स्थानाचा मालक सूर्य आहे, जो व्यय स्थानात मंगळासोबत असल्यामुळे गैर जरूरी खर्च किंवा मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्याज किंवा उधार दिलेले पैसे परत मिळण्याची उमेद आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून आर्थि व्यक्तिगत आणि व्यावसायिक उद्देश्यासाठी नवीन वाहन खरेदीचे योग तयार होत आहे.

वृश्चिक : घरात वस्त्र दागिने, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, सुख सुविधा इत्यादी साधनांची खरेदी करू शकता. विद्यार्थी वर्गासाठी वेळ अनुकूल नाही आहे. दूरस्थ किंवा परदेशात राहत असलेल्या ओळखीच्या लोकांशी संपर्क वाढेल. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही मानसिक बेचैनी अनुभवाल. तुमची स्थिती डगमग राहील, म्हणून या वेळेस कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय घेऊ नका.क मदत मिळू शकते.

धनू : संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. उद्योग असलेल्या जातकांना चांगला फायदा मिळणार आहे. तुम्ही नवीन मशीनरी किंवा जागा विकत घेऊ शकता. तुम्हाला व्यापार विस्तारणीसाठी कौटुंबिक सदस्यांची मदत मिळेल, खास करून पुत्रांची. हा आठवडा तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरणार आहे.

मकर : आठवड्याच्या सुरुवाती आणि शेवटचा टप्पा तुमच्यासाठी उत्तम आहे. परंतु मधला काळ थोडा कठिण जाणार आहे. 14 तारखेला तुम्हाला कुणाकडून भेटवस्तू मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे.  

कुंभ : कौटुंबिक बाबतीत विनम्रतेची वागणूक करून त्याचे समाधान काढा. शेयर बाजारात विचार करून गुंतवणूक करा. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृतकरण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. बायको किंवा मुलीच्या नावावर एखाद्या नवीन व्यवसायात गुंतवणूक केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे लोक विवाह करण्यास उत्सुक आहे त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल आहे.

मीन : ज्या लोकांना परदेशात जायचे आहे त्यांना नक्कीच या आठवड्यात यश मिळेल. पार्टनरशिप असलेल्या व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत नवीन व्यवसाय सुरू करण्याचा योग जुळून येत आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे. गणेशजींचा सल्ला आहे की थोडे सावधगिरीने चाला. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. 
सर्व पहा

नवीन

Ramanuja Jayanti 2026 आज रामानुज जयंती, का साजरी केली जाते? ५ रंजक तथ्ये जाणून घ्या

बुधवारी करा गणपतीची ही खास पूजा; सर्व अडथळे दूर होतील

आरती बुधवारची

गंगा सप्तमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

मंगळवारी करा श्री हनुमान स्तवन स्तोत्र पठण अर्थासह

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments