Dharma Sangrah

साप्ता‍हिक राशीफल 15 ते 21 जानेवारी 2017

Webdunia
शनिवार, 14 जानेवारी 2017 (16:00 IST)
मेष : या आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबींसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे बरेच स्रोत राहणार आहे, पण अनायस होणार्‍या खर्चांची शक्यता आपण नाकारू शकत नाही. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढेल. कौटुंबात देखील तुम्हाला महत्त्व मिळेल. सरकारी अधिकारी आणि उच्चाधिकार्‍यांसोबत होणारी भेट तुम्हाला येणार्‍या भविष्यात चांगली फलदायी ठरणार आहे. 
 
वृषभ : या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण तुम्ही त्याचे आनंद घेण्यास मुकाल. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्ही मानसिक रूपेण अस्वस्थ व्हाल. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. घराण्याच्या स्थावर मालमत्तेतून काही आर्थिक फायदा होईल.
 
मिथुन : हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढ उतार लक्षात येईल. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळणार आहे. स्वतंत्र कार्य करणार्‍या लोकांना लहान सहानं कार्य मिळत राहणार आहे. 17 व 18 तारखेला शासकीय कामात न्यायालयीन अडथळा येण्याची शक्यता आहे. कवि, कलाकार, गायक, लेखक यांना चांगल्या संधी चालून येतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल.  
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे अधिक काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे विश्वासपात्र अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या गैर हजेरीचा फायदा घेण्याचा भरपूर प्रयत्न  करतील.  तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे या आठवड्यात अधिक लक्ष द्या. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नांवलौकिक मिळेल. त्यांच्या कार्याचा गौरव केला जाईल. जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा.  
 
सिंह : आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक प्रकरणात काळजी राहण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत संबंधी संपूर्ण आठवडा उत्तम राहणार आहे. 16, 17 आणि 18 तारखेला आर्थिक स्थिती कमजोर राहणार आहे. पण हळू हळू त्यात सुधारणा येईल. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता.
 
कन्या : या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फारच गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक बाबतीत समजुतदारी आणि समाधानाचे धोरण ठेवावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे लागणार आहे अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुमच्या उजव्या डोळ्या किंवा कानाचा त्रास होऊ शकतो.
 
तूळ : या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरणात तणाव, शारीरिक तंदुरस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत थोडी फार सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ मिळणार आहे आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. तुमच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा हा आठवडा आहे. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुम्ही भविष्यासाठी गुंतवणूक कराल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. या आठवड्यात जोडीदाराची पदोन्नती होईल.
 
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंद अनुभवाल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळू शकतो किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही पूर्णपणे सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले बरेच काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघू शकतात.
 
मकर : या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे किंवा मनोरंजनावर जास्त वेळ घालवाल. लग्न समारंभ किंवा सामाजिक प्रसंगांमध्ये जाण्याचा योग आहे. मित्र किंवा परिचितांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रवासादरम्यान लहान सहानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भाऊ बहीण किंवा मावशीपक्षासोबत तुमचे संबंध अधिक घट्ट होतील.
 
कुंभ : तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येत राहणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे.
 
मीन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला बचतीकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. या आठवड्यात तुम्हला व्यर्थ खर्चांवर अंकुश लावणे फारच गरजेचे आहे. जर तुम्ही यात अपयशी ठरल्यास तर तुमचे महत्त्वाचे काम धना अभावामुळे बिघडू शकतात. व्यवसायात गुंतवणूक केल्यामुळे तुमचा हात तंग राहू शकतो. कामाची आखणी नियोजनबद्ध केल्यामुळे व्यावसायिक उत्कर्ष साधता येईल. 
सर्व पहा

नवीन

Gadge Baba Suvichar संत गाडगे बाबा दशसूत्री संदेश जीवनासाठी अत्यंत उपयुक्त

होळीच्या दिवशी ३ तुळशीच्या पानांनी करा हे तीन काम, नकारात्मक उर्जेपासून मुक्ती मिळेल

चन्द्रचूडालाष्टकम् Chandrachoodaalaa Ashtakam

संत गाडगे बाबा निबंध मराठी

सोमवारी या 8 गोष्टी करू नका, नाहीतर तुम्हाला पश्चाताप होईल

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख
Show comments