Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मार्च 2019चे मासिक भविष्यफल

Webdunia
शुक्रवार, 1 मार्च 2019 (10:16 IST)
मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) 
या राशीच्या व्यक्ती अत्यंत तेजस्वी, बुद्धीमान असतात. लोकांना आपलंसं करणारी ही रास असून, या व्यक्तींच्या जिभेवर मध असते असं म्हणतात. आपलं काम करताना कोणत्याही व्यक्तीला न दुखावण्याचा मानस या व्यक्तींचा असतो. 
 
वृषभ राशीसाठी हा महिना सर्वार्थाने चांगला महिना आहे. अनेक रखडलेली कामं मार्गी लागतील. नौकरीत मनाप्रमाणे बदल होतील. कौटुंबिक आरोग्य चांगले राहिल. मनासारखे काम होईल. फक्त अधिकार्‍यांची मर्जी सांभाळा. कुटुंबीयांच्या साहाय्याने जीवनात आनंद निर्माण होईल. पैशाचा अपव्यय टाळा. बाहेर फिरायला जाण्याचा कार्यक्रम बनू शकतो. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. 
 
व्यापार, देण्‍या-घेण्याचे व्यवहार करताना सतर्क रहा.आपल्या विचारांना या महिन्यात कलाटणी मिळण्‍याची शक्यता आहे. आपण एखाद्याला दिलेला शब्द या महिन्यात पूर्ण होईल. दिनांक 15, 23 शुभ व 7,19 अशुभ. 
 
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
आपले नवे घर बनू शकते. व्यापारात गती सामान्य राहील. राजनैतिक क्षेत्रात आपले वर्चस्व वाढू शकेल. विरोधक आपल्यासमोर मात खातील. हो, फालतू कायदेशीर प्रकरणात फसण्यापासून वाचा. थोड्या विशेष व्यापारी वर्गाला लाभ होऊ शकेल. 
 
आपल्या राशीचा स्वामी मंगळ आहे. प्रथम राशी असल्याने विचारांमध्ये उत्तेजना दिसून येते. या राशीच्या व्यक्ती अत्यंत उत्साही आणि कर्तव्यदक्ष असतात, कामाच्या प्रती जबाबदारीचे भान त्यांना असते.
 
फेब्रुवारी महिन्यात निर्माण झालेले कौटुबिक वाद या महिन्यात संपतील. एक नवीन काम हाती घ्याल. एकादी गोड बातमीही आपले जीवन बदलून टाकेल.या महिन्यात आर्थिक योग चांगले असल्याने आर्थिक प्रश्‍न मार्गी लागतील. नौकरी तसेच व्यापारात चांगला फायदा होईल. फिरण्‍याचे योग येतील, पण जरा जपून आणि काळजीने आखणी करा. दिनांक 10,18 शुभ व 14, 26 अशुभ आहे.  
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा) 
चांगला काळ येणार आहे. शुभ संदेश आयुष्यात आनंदाची पखरण करतील. या शुभ काळाचा पूर्ण फायदा घ्या. मिळकतीची नवी साधने उपलब्ध होतील. कुटुंबात सुख-शांती नांदेल. मन प्रसन्न राहील. व्यापारी लोकांसाठी नव्या संधी उपलब्ध होतील. 
 
या राशीचा स्वामी बुध आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत संयमी आणि सहकार्य करणार्‍या असतात. त्यांना शिस्तीत जगणे आवडते. 
 
उत्साह वाढवणारा महिना असेल. कार्यकुशलता वाढीस लागेल, घर, दुकानासंदर्भातील अडचणी सुटतील. नौकरीत प्रगती संभावते. नवीन काम करताना गणेश पूजनाने सुरुवात करा. विवाहादीक कार्यांसाठी हा महिना उत्तम असल्याने चांगले योग जुळून येतील. दिनांक 10,19 शुभ व 13,15 अशुभ. 
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो) 
या राशीचा स्वामी चंद्र आहे. चंद्र नेहमीच आपली स्थीती बदलत असल्याने या राशीच्या व्यक्ती अत्यंत चंचल असतात. दुसर्‍यांच्या वागण्‍याने मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
 
सेवेसाठी काही वेळ द्या, लाभ होईल. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा. सतत अनिश्‍चिततेचे वातावरण असल्याने मनावर ताण येण्‍याची शक्यता आहे. प्रवास योग आहे. एखाद्या तिर्थक्षेत्राला भेट देण्‍याची इच्छा निर्माण होईल. कौटुबिक वाद टाळा. दिनांक 8, 17 शुभ व 15,19 अशुभ. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे)
अगदी नावाप्रमाणे रास आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत चिकाटीने काम करणार्‍या असतात. एखादे काम हातात घेतले तर ते पूर्ण केल्यावर स्वस्थ बसायचे अशी प्रवृत्ती या राशीच्या व्यक्तींमध्ये दिसून येते. 
 
मेहनतीचे फळ दिसू लागले आहे, पण अति महत्त्वाकांक्षी बनू नका. रणनीती अवलंबूनच पुढे व्हा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. लक्षात असू द्या, प्रेम देण्याचे नाव आहे म्हणून प्रेमसंबंधात देणे शिका. सतर्क न राहिल्याने या महिन्यात मोठा फटका बसण्‍याची शक्यता आहे. प्रयत्नांनंतर परिस्थिती नियंत्रणात येईल. पण कष्टाची तयारी ठेवा. महिन्याच्या मध्यात अनेक व्यापार योग असल्याने परिस्थिती पुन्हा सुधारेल. संधी आली तर सोडू नका. 6,19 शुभ व 14, 28 अशुभ. शिव आराधना करावी. 
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
या राशीच्या व्यक्ती अत्यंत शांत व संयमी असतात. संकोच त्यांच्या स्वभावातच असतो, मात्र योग्य जागी स्पष्ट मत व्यक्त करण्यासही या राशीच्या व्यक्ती धजावत नाहीत. 
 
नशीबाचे ग्रह पालटत आहेत, पण दृढ इच्छाशक्तीशिवाय तुम्हाला यश मिळणारच नाही. तुमच्या मेहनतीचे कौतुक तर होईल पण यासह शत्रूंचे तुमच्याप्रती वैमनस्य वाढेल. वेळॆचे नीट नियोजन केल्यास अडलेली अनेक कामे होऊ शकतील. यावर ध्यान देण्याची गरज आहे. मनाला बेचैन करणारा महिना आहे. उत्साह मावळल्याने कामं रखडतील. आळशीपणा वाढेल. अनुभव आणि योग्य विचार करुनच निर्णय घ्या. परिस्थिती समजूनच पावलं उचला. दिनांक 11,23 शुभ व 15, 26 अशुभ.
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
या राशीच्या व्यक्ती अत्यंत तर्कसंगत असतात. स्वच्छता, शिस्त यामुळे त्यांच्यात तेज असते. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव अत्यंत नम्र असतो. 
 
धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रांसपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर रहा. उत्साह वाढेल. योग्यतेनुसार ज्ञानाचा वापर करण्‍याची संधी मिळेल. संधीचे सोने करण्‍याची तयारी असावी. दृष्टीकोण स्पष्‍ट ठेवा. जबाबदार्‍या वाढल्याने मानसिक संतूलन खराब होण्‍याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. दिनांक 6,17 शुभ व 7, 21 अशुभ.
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू) 
या राशीच्या व्यक्तींची खासीयत म्हणजे या राशींच्या व्यक्तींच्या स्वभावामुळेच त्यांना अधिक त्रास होत असतो. प्रामाणिकपणा, स्पष्टपणा,अशा स्वभावगुणांमुळे या राशीच्या व्यक्तींचे इतरांशी फारसे पटत नाही. 
 
तुमच्या कामाचे कौतुक तर केले जाईल, पण त्यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल. तब्येत सामान्य राहील. बॉससोबतचे संबंध सुधारतील. शत्रू शांत राहतील. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे. या महिन्यात आत्मविश्‍वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहिल. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्‍याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नौकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे. दिनांक 3, 15 शुभ व 12, 19 अशुभ.
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे) 
या राशीचा स्वामी गुरु आहे. ज्ञान, आदर, संमय या गुणांची प्राप्ती गुरुच्या माध्यमातूनच होत असल्याने या राशींच्या व्यक्तींमध्ये हा गुण दिसून येतो. 
 
अत्यंत फलदायी असा हा महिना आहे. मानसिक आरोग्य सुधारेल. मन प्रसन्न रा‍हिल. साहस वाढेल. घाई-गडबडीने निर्णय घेऊ नका. आर्थिक फायदा मिळेल. करार किंवा कायदेविषयक बाबींमध्ये सतर्क रहा. राजकारणात प्रवेश करण्‍याचा विचार मनात घोळ घालेल, परंतु जरा विचार करुन निर्णय घ्या. महिन्याचा पहिला पंधरवडा थोडा निराशाजनक असेल. होणारी कामे फार प्रयत्न करुनही न झाल्याने निराशा येईल. कोर्टाच्या प्रकरणात फसण्याची शक्यता आहे, यासाठी तुमच्या रागाला नियंत्रणात ठेवा. कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहणेच योग्य होईल. १५ तारखेनंतर परिस्थिती सुधारेल. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. साहित्यिकांसाठी हा महिना उत्तम आहे. दिनाक 8, 22 शुभ व 12, 24 अशुभ. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी) 
मार्च महिन्यातही परिस्थिती फारशी सुधारताना दिसत नाही. यापूर्वीच्या महिन्याप्रमाणेच याही महिन्यात त्रास संभावतो. विरोधकांना प्रतिक्रीया देण्‍याचा मुळीच विचार करु नकात. 
 
नौकरी आणि व्यवसायात जरा सांभाळून वागा. साधारण महिना. सत्पुरुषांच्या साथीने लाभ मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका. या राशीचा स्वामी शनी आहे. या राशीच्या व्यक्ती अत्यंत निराळ्या असतात. या राशींच्या व्यक्तींचा कामाचा मुख्‍य आधारच यांचा विचार असतो. अत्यंत सृजनशील असा स्वभाव असल्याने या व्यक्ती निर्णय घेण्यात सक्षम असतात. दिनाक 5, 15 शुभ व 6, 18 अशुभ. 
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द) 
शनीप्रधान राशी आहे. साहस, स्पष्टवक्तेपणा, शिस्त हे या राशीतील व्यक्तींचे मुख्‍य गुण आहेत. क्रोध, स्वावलंबी असल्याने अनेकवेळा या राशींच्ये इतरांशी खटकते. 
 
१५ तारखेच्या आधी नवे काम सुरु करु शकता. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवडयात परिस्थिती बदलू शकते. दूरुन एखाद्या शुभ समाचार कळू शकतो. अडकलेले धन पुन्हा मिळेल. कायदेशीर बाबी त्रास देऊ शकतात. नकारात्मक लोकांपासून दूरच राहा. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल. या महिन्यात चिडचिडेपणा वाढण्‍याची शक्यता अधिक आहे. कोणत्याही व्यक्तीच्या विश्वासावर निवांत बसून नका. विश्वासघात होण्याची शक्यता आहे. नौकरीत प्रगती. प्रमोशनची शक्यता. कोर्टाची कामं मार्गी लागतील. कौटुंबिक दृष्‍टीने चांगला महिना आहे. दिनांक 18, 29 शुभ व 10, 17 अशुभ.
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची)
या राशीचा स्वामी गुरु हा आहे. या राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अत्यंत गंभीर, शांत, सहिष्णू असा असतो. जबाबदारीचे भान असल्याने या व्यक्तींवर सोपवण्‍यात आलेली जबाबदारी ते योग्य पद्धतीने पार पाडतात. 
 
बॉससोबत वाद होऊ शकतो, तुमचा अहंकार परिस्थिती बिघडवू शकतो. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यता आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही केलेली घाई-गडबड, नुकसान करू शकते. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, जोडीदाराचे वागणेही तुम्हाला त्रासात टाकू शकते. स्वाभावातील चिडचिडेपणा वाढेल.छोट्या गोष्टींमध्ये वाद करणे टाळा.मतभेद दूर करण्‍याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या महिन्यात अनेक आर्थिक व्यवहार करावे लागतील. दिनांक 13, 24 शुभ व 6, 18 अशुभ. गायत्री मंत्राचा जप करावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

Kartik Amavasya 2024 कार्तिक अमावस्या कधी ? तारीख आणि पूजा विधी जाणून घ्या

कालभैरवाष्टकम् Kalabhairava Ashtakam

Kotwal of Kashi काल भैरवाला काशीचा कोतवाल का म्हणतात?

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

पुढील लेख
Show comments