Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 14 ते 20 जुलै 2019

साप्ताहिक राशीफल 14 ते 20 जुलै 2019
Webdunia
शनिवार, 13 जुलै 2019 (16:49 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र आघाडीवर राहील व व्यवसायिक वर्तुळातील प्रगतीचे पुढचे पाऊल पुढेच राहून व्यावसायिक समस्या जाणवणार नाहीत. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येईल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात महत्त्वपूर्ण स्वरूपाचा प्रवास योग घडून येईल. सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील व कोणत्याही बाबतीत पीछेहाट सहसा होणार नाही. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिध्द होईल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येईल व उद्योग क्षेत्रातील अंदाज अचूक ठरतील. अधिकारी वर्गाची मर्जी आपल्यावर पूर्णपणे राहू शकेल.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच आवश्यक व उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी आहे. काळजीचे सावट काही प्रमाणात कमी होण्याचे संकेत मिळतील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. ग्रहस्थिती अनुकूल आहे व यश समोर दिसू लागेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून चांगल्या स्वरूपाचा लाभ घडेल व नवीन भागीदारी प्रस्ताव समोर येईल. तो जरूर जरूर स्वीकार करावा, लाभप्रद ठरेल. अपेक्षित घडामोडी व घटना घडून येतील व यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे भावी काळाच्या दृष्टीने नुकसानकारक ठरू शकेल. योग्य ती काळजी घेणे चांगले.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात निरागस आरोग्याचा लाभ मिळू शकेल. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण राहणार नाही व यशस्वितेकडे वाटचाल राहू शकेल. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील व काळजीचे सावट दूर होऊ शकेल.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेत अपेक्षित यश मिळेल व संततीबाबत आनंद वार्ता हाती येईल. आर्थिक आवक समाधानकारक राहून आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील व निरागस आरोग्याचा लाभ मिळेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहील व वेळेवर सहकार्य मिळून उत्साह वाढेल.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक समस्या मिटतील व कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक शांतता व समाधान टिकून राहील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. परंतु कौटुंबिक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्ग आवश्यक ते सहकार्य करतील व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. स्थगित व्यवहार सुरळीतपणाच्या मार्गी लागतील व सर्वत्र यश समोर दिसेल. अंतिम चरणात पारिवारिक सदस्य मंडळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील. क्रीडा क्षेत्र बक्षीसपात्र स्थितीतच राहील व मनावरील काळजीचे सावट दूर होऊ शकेल.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व इतरांकडून येणारा पैसा या ना त्या कारणपरत्वे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहील. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे उचित ठरेल. अंतिम चरणात पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी ठरेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक शांतता प्रस्थापित स्वरूपातच राहून यश मिळेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट काही प्रमाणात मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व यश मिळू शकेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता काही प्रमाणात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त एकणेपुरतेच र्मयादित ठेवणे उचित ठरेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक ठरेल व भावी काळात होणार मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देईल व काही प्रमाणात काळजी व समस्या मिटेल. मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत येतील. स्थगित व अपूर्ण योजना गतीने पूर्ण होतील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनातील इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे भेटीयोग जुळून येतील व मानसिक सुख-शांती व समाधान लाभेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे आवश्यक ठरेल. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. त्यामुळे होणारे नुकसान टळेल.
सर्व पहा

नवीन

Fasting Recipe मखाना पराठा चैत्र नवरात्रीत नक्की ट्राय करा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

शनिवारची आरती

Chaitra Navratri 2025 Wishes in Marathi चैत्र नवरात्रीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

पुढील लेख
Show comments