Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 11 ते 17 ऑगस्ट 2018

Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2019 (16:34 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे दडपण वाढेल व यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. तरच काही प्रमाणात यश दृष्टिक्षेपात राहू शकेल. वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना विशेष सावधानता ठेवणे उचित ठरेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल होऊन मनाला दिलासा मिळेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील. 
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीत असणारा वाद अधिक प्रमाणात वाढणार नाही याची विशेष काळजी घेणे आवश्यक ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. नवीन भागीदारी प्रस्ताव काळजीपूर्वकच स्वीकारणे उचितपणाचे राहू शकेल. अंतिम चरणात कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेपुरतेच र्मयादित ठेवणे चांगले ठरेल. वाहनापासून धोका संभवतो. 
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा जुनेच आजार पुन्हा त्रासदायक स्वरूपाने समोर येण्याची दाट शक्यता आहे. विरोधक मंडळींच्या कारवायांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक ठरेल व होणारा मनस्ताप टळू शकेल. अंतिम चरणात भागीदारी क्षेत्र समस्या व अडचणी निर्माण करणारे राहील. नवीन भागीदारी प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार व स्वीकार काळजीपूर्वकच करावा. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढविणारी ग्रहस्थिती आहे कोणत्याही बाबतीत इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये; अन्यथा भावी काळाच्या दृष्टीने मनस्ताप संभवतो. स्पर्धा परीक्षेत परिश्रम वाढविले तरच यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेणे चांगले ठरेल. सर्वत्र ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे वाटचाल करणे.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक क्षेत्रामधील मतभेद व संघर्ष वाढण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. क्रीडा क्षेत्रात संघर्ष करूनच यश मिळवावे लागेल. सहकारी वर्ग अपेक्षित सहकार्य करण्यास असर्मथ राहील. अंतिम चरणात संततीबाबत काळजी निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक स्थिती अस्थिर राहील. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहतील.
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात संघर्ष निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात कार्यसभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. त्यामुळे इतरांबरोबर असणारे वाद अधिक वाढू शकतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीत राहतील.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व कर्ज व्यवहार प्रकरणे विविध कारणास्तव स्थगितीच्या मार्गावर राहतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्‍वासन ते पूर्ण करण्यास असर्मथ स्थितीतच राहू शकतील. अंतिम चरणात परिस्थिती सुधारेल. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकेल. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात कामगिरी चांगली राहील. बक्षीस व मानसन्मान मिळून उत्साह वाढीस लागू शकेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनावर काळजीचे सावट व दडपण राहील. काही बाबतीत मनस्ताप सहन करावा लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच आवश्यक व श्रेयस्कर ठरेल. परिस्थिती अनुकूल राहील. अंतिम चरणात आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. कर्ज व्यवहार प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेमधून बाहेर येतील व भावी काळाच्या दृष्टीने आर्थिक अडचणी मिटतील.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात विविध कारणास्तव अनावश्यक व मनाविरुध्द खर्च निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहणे अहितकारक ठरू शकेल व भावी काळात अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनावरील दडपण व काळजीचे सावट मिटण्याच्या मार्गावर राहील व दूर गेलेले यश पुन्हा जवळ येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक टंचाई मिटेल व आर्थिक स्थिती मजबुतीच्या शिखरावर राहील; परंतु काही प्रमाणात अचानक खर्चाच्या प्रसंगास समोर जावे लागेल, विशेष करून पारिवारिक व मित्रमंडळीच्या संदर्भात खर्च करणे आवश्यक स्वरूपाचे ठरेल. अंतिम चरणात इतरांना मदत करावी लागेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास दगदग व त्रास वाढविणारा ठरू शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग अगर व्यवसाय, नोकरी आदी क्षेत्रातील अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांबरोबर असणारे मतभेद अधिक वाढणार नाही याची काळजी घेणे उचित ठरू शकेल व होणारा मनस्ताप काही प्रमाणात टळेल. अंतिम चरणात आर्थिक अस्थिरता मिटेल. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे या सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. हातात पैसा खेळताच राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात प्रवास मार्गात दगदग व त्रास वाढेल. इतरांबरोबर असणारे मतभेद मानसिक अशांतता निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील. सहकारी वर्गाबरोबर असणारे वाद अधिक वाढवू नयेत, अन्यथा मनस्ताप सहन करावा लागेल. अंतिम चरणात व्यावसायिक प्रगती समाधानकारक राहील व वरिष्ठांबरोबर संबंध सुरळीत राहतील व मतभेद होणार नाहीत. मनोनुकूल व इच्छित स्थळी बदली योग जुळून येतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

रविवारी करा आरती सूर्याची

रविवार: या गोष्टी लक्षात ठेवा, पूर्ण आठवडा आनंदी राहाल

Kaal Bhairav Jayanti 2024: काल भैरव जयंती कधी आहे? पूजेची तारीख आणि पद्धत

श्री सूर्याची आरती

संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल 5 खास गोष्टी जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments